मातृत्वाला काळिमा फासणाऱ्या त्या आईच्या निंदनीय कृत्याचा जनमानसात संताप, नवजात अर्भकाचा उपचारादरम्यान मृत्यू

एक २१ वर्षीय युवक नेहमीप्रमाणे गुरे चरायला घेऊन गेला असता त्याला जोरात जोरात कावळ्याचा ओरडण्याचा आवाज आला इतक्या मोठ्या प्रमाणात कावळे ओरडत आहेत याचा संशय त्याला आला म्हणून त्याने झुडपात पाहिजे त्याला एक नवजात शिशु जोरात रडत होते हे दिसून आले.

    अखेर त्या नवजात अर्भकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मातृत्वाला काळिमा फासणाऱ्या त्या आईच्या निंदनीय कृत्याचा जनमानसात संताप होतोय. दिनांक ७ सप्टेंबर २०२१ रोजी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना सायंकाळी चार वाजता समोर आली आहे. यामागे एक २१ वर्षीय युवक नेहमीप्रमाणे गुरे चरायला घेऊन गेला असता त्याला जोरात जोरात कावळ्याचा ओरडण्याचा आवाज आला इतक्या मोठ्या प्रमाणात कावळे ओरडत आहेत याचा संशय त्याला आला म्हणून त्याने झुडपात पाहिजे त्याला एक नवजात शिशु जोरात रडत होते हे दिसून आले.

    कावळे तोच मारत होते त्या बालकाच्या डोक्यावर कावळ्याने चोच मारून जखम केली होती तसेच झुडुपातील किड्यामुंग्यांनी चावून त्याच्या अंगावर ही इजा केली होती हे सगळे विदारक दृश्य पाहून त्या २२ वर्षीय मुलाने क्षणाचाही विलंब न लावता त्या नवजात बालकाला कपड्यात गुंडाळले व घटनेची माहिती रोहा पोलीस स्टेशनला दिली व रोहा पोलीस स्टेशने घटनेचे गांभीर्य ओळखून घटना ठिकाणी धाव घेऊन सदर अर्भकाला प्राथमिक उपचार म्हणून रोहा सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले व त्यानंतर पुढील उपचारासाठी अलिबाग सिव्हिल हॉस्पिटल येथे हलविण्यात आले होते.

    उपचारादरम्यान नवजात शिशु आज सकाळी पाचच्या सुमारास काळाने घाला घातला व नवजात शिशु मरण पावले असून पुढील तपास स्वतःच्या पोटच्या गोळ्याला अशा रीतीने टाकून देणाऱ्या आई-वडिलांचा शोध रोहा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय पाटील हवालदार श्री पाटील घेत आहेत