आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते म्हसळा तालुक्यातील नुकसानग्रस्तांना देण्यात आले शासकीय मदतीचे धनादेश

म्हसळा : तीनजून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने काही क्षणातच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत केले. वादळात प्रचंड प्रमाणात वित्तहानी झाली. अनेकांचा संसार पूर्णपणे

म्हसळा : तीन जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने काही क्षणातच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत केले. वादळात प्रचंड प्रमाणात वित्तहानी झाली. अनेकांचा संसार पूर्णपणे उध्वस्त झाला तर काहींना अन्न, पाणी, निवारा विना दिवस काढावे लागत आहेत. अशा परिस्थितीत आपला वाली कोण असेल तर शासन आणि लोकप्रतिनिधी म्हणूनच जनता शासनाच्या मदतीची वाट पाहत आहे.

महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, विरोधीपक्ष नेते, सामाजिक संस्था आदीनी धाव घेऊन वादळग्रस्तांना तातडीची मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना आता यश मिळत आहे. शासन स्तरावर महसूल विभागाच्या मार्फत लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्याने म्हसळा तालुक्यातील चिखलप, देवघर कोंड, मेंदडी, वारळ आणि खामगाव या गावातील ज्या आपद्ग्रस्तांच्या घरांचे अतोनात नुकसान झाले आहे त्या नागरिकांना त्यांचे नुकसानीप्रमाणे शासनामार्फत मंजुर करण्यात आलेल्या १.५ लक्ष रुपयांच्या मदतीचे धनादेश आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी त्यांच्यासोबत रायगड जिल्हा परिषद कृषी सभापती बबन मनवे, सभापती उज्वला सावंत, माजी सभापती नाझीम हसवारे, तालुका अध्यक्ष समीर बनकर, मुंबई अध्यक्ष महेश शिर्के, माजी सभापती छाया म्हात्रे, माजी उपसभापती संदीप चाचले, अनिल बसवत, जमीर नजिरी, लहु म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. निसर्ग चक्री वादळाचे आपत्कालीन परिस्थितीत ज्यांचे नुकसान झाले आहे त्या सर्व जनतेला शासनाने केलेल्या पंचनामा प्रमाणे नुकसान भरपाई मिळणार आहे. शासनाचे मदतीपासून कोणी वंचित राहणार नाही ,असे आमदार अनिकेत तटकरे यांनी सांगितले.