रोहाच्या राजाचे आमदार अनिकेत तटकरे यांनी घेतले दर्शन

रोहा : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ रोहाच्या राजाचे दर्शन आमदार अनिकेत तटकरे यांनी घेतले यावेळी त्यांच्यासमवेत नगरसेवक दिवेश जैन, रवी चालके इतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे राजेश काफरे यांच्यातर्फे आमदार अनिकेत तटकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावर्षी कोरोनाचे सावट गणपती उत्सवावर आहे त्यामूळे गणेश मुर्ती आकाराने लहान आणुन साधेपणाने उत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला. रोहेकराना गणपती उत्सव म्हणजे पर्वणी परंतू गणेश भक्तांचा कोरोनामुळे हिरमोड झाला आहे. १० दिवसाचे सार्वजनिक गणेशोत्सव ठिकठिकाणी साधेपणाने साजरे होत आहेतयावेळी आमदार अनिकेत तटकरे यांनी जगावर आलेल्या कोरोनासारख्या संकटाला विघ्नहर्त्या गणरायाने दूर करावे, असे साकडे यावेळी घातले अणि हे संकट बाप्पा निश्चित दूर करेल असा आशावाद यावेळी त्यांनी व्यक्त केला