चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आ. अनिकेत तटकरे यांची तळा येथे आढावा बैठक

तळा: तळा तालुक्याला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसून घरे,शेती,बागायती व शाळेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच विद्युत खांब कोसळल्याने अनेक दिवसांपासून तालुक्याचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला

तळा: तळा तालुक्याला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसून घरे,शेती,बागायती व शाळेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच विद्युत खांब कोसळल्याने अनेक दिवसांपासून तालुक्याचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता त्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे आ.अनिकेत तटकरे यांनी तळा तहसिल कार्यालयात आढावा बैठक घेऊन नुकसानग्रस्त नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. सुनिल तटकरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक संकुलाच्या उभारणीसाठी प्रत्येक शाळेला ५०  ते १०० पत्रे भेट देण्यात येणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी तहसीलदार ए.एम.कनशेट्टी, नायब तहसीलदार पी.खरोडे,नगराध्यक्षा रेश्मा मुंढे,मुख्याधिकारी माधुरी मडके,नगरसेवक चंद्रकांत रोडे,पत्रकार बांधव व नागरिक उपस्थित होते. निसर्ग चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे खत व बि,बियाणे  भिजून  मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यांना  कृषी विभागामार्फत मदत देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तसेच चक्रीवादळात अंगणवाड्या,प्राथमिक आरोग्य केंद्र,तहसिल कार्यालय यांचे जे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करून त्यांना देखील शासनाकडून भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आ. अनिकेत तटकरे यांनी सांगितले.