जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारी टोळी सक्रीय

पेण: काल मध्यरात्रीच्या सुमारास  कत्तलखान्यात जनावरांना घेऊन एमएच १२ एनबी- ३३३६ स्विफ्ट गाडी खालापूर वरून पेण(pen) बाजूकडे जात असल्याची खबर पेण पोलिसांना मिळताच पोलिसांनी पेण खोपोली रोडवरील मौजे गणपती वाडीच्या हद्दीत नाकाबंदी केली. रात्री २.४५ च्या दरम्यान या रोडचा अंदाज न घेता गाडी जोरदार चालवित नाकाबंदीसाठी असलेले हवालदार बी.के.वाढवे यांच्या अंगावर घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या अपघातात हवालदार वाढवे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या स्विप्ट गाडीतील दोन जण पळून गेले असून गाडीसह एक जनावर पेण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा र.नं.१२५ नुसार त्यांच्यावर कलम ३०७,३३३ प्रमाणे ११(क) (घ) सार्वजनिक मालमत्ता, प्राणी संरक्षण अधिनियम आदिंसह अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपअधीक्षक नितीन जाधव यांच्या आदेशानुसार व पेण पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.