Arnab's Republic TV hit internationally, fined Rs 20 lakh

उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांचा जामीनअर्ज फेटाळल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने दोन्हीकडील पक्षाचे म्हणणे ऐकून घेत अर्णब गोस्वामी यांच्यासह फारूख शेख आणि नितेश सारडा या तिघांना अंतरिम जामीन मंजूर केला.

अलिबाग :  वास्तुरचनाकार अन्वय़ नाईक आत्महत्येप्रकरणी खासगी वृत्तवाहिनीचे संपादक आणि मालक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात रायगड पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या पुनर्निरीक्षण अर्जावर २३ नोव्हेंबरला सुनावणी होणार होती. मात्र, न्यायालय रजेवर असल्याने ही सुनावणी आता ५ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात एका खासगी वृत्तवाहिनीचे संपादक आणि मालक अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर रायगड पोलिसांनी येथील सत्र न्यायालयात दाखल केलेल्या पुनर्निरीक्षण अर्जावर आणि आरोपींच्या जामीनअर्जावर २३ नोव्हेंबरला सुनावणी होणार होती. आरोपींपैकी अर्णबच्या वकिलांनी सत्र न्यायालयातील जामीन अर्ज काढून घेतल्याने आता फिरोज शेख आणि नितेश सारडा या दोन आरोपींचे जामीन अर्ज न्यायालयात शिल्लक आहेत.

उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांचा जामीनअर्ज फेटाळल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने दोन्हीकडील पक्षाचे म्हणणे ऐकून घेत अर्णब गोस्वामी यांच्यासह फारूख शेख आणि नितेश सारडा या तिघांना अंतरिम जामीन मंजूर केला.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे सत्र न्यायालयात सुरु असलेल्या रायगड पोलिसांच्या पुनर्निरिक्षण याचिकेवरील आणि फारुख शेख, नितेश सारडा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. ही सुनावणी २३ नोव्हेंबर रोजी होणार होती. फिरोज शेख व नितेश सारडा यांना अंतरिम जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेला असला, तरी अद्याप सर्वोच्च न्यायालयाकडून निकालाची प्रत सत्र न्यायालयाला मिळालेली नसल्याने या प्रकरणातून कायमस्वरुपाचा जामीन अर्ज अजुनही मागे घेता आलेला नाही.

त्यातच रायगड पोलिसांच्या पुनर्निरिक्षण याचिकेबाबत उच्च न्यायालयाने आक्षेप घेतलेला नसून, सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत कोणताही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे पुनर्निरिक्षण याचिकेवर निकाल देण्याबाबत सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयाकडे मागणी केलेली आहे.