रायगड जिल्ह्यात महवितरणचा मनमानी कारभार, वीज ग्राहकांकडून उकळली जाते अतिरिक्त रक्कम

चार महिन्या नंतर रिडींग घेऊन मार्च पासुन ऑगस्ट पर्यंत रिडींग प्रमाणे पाच महिन्याची वीज बिले ग्राहकांना आकारून देण्यात आली आहेत. परंतु वीज ग्राहकांनी पाच महिन्यांची वीज बिले भरली आहेत तरीही रिडींग प्रमाणे हि पुर्ण बीले भरावी लागतील असे महावितरण कंपनी कडून सांगितले गेले.

सुतारवाडी : मार्च ते जुलै या महिन्यात कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाटव लक्षात घेता संपूर्ण देश सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला. याच संधीचा फायदा घेत महवितरण कंपनीचा (MSEDCL in Raigad district) मनमानी कारभार सुरु असुन, वीज ग्राहकांकडुन अतिरिक्त रक्कम (additional amount ) उकळली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

मार्च ते जुलै महिन्यात लॉकडाऊनमूळे महावितरण कंपनी कडून मिटरची रिडिंग घेण्यासाठी कोणीही न येता वीज ग्राहकांना चार महिने अंदाजे वीज बिले दिली. चार महिन्या नंतर रिडींग घेऊन मार्च पासुन ऑगस्ट पर्यंत रिडींग प्रमाणे पाच महिन्याची वीज बिले ग्राहकांना आकारून देण्यात आली आहेत. परंतु वीज ग्राहकांनी पाच महिन्यांची वीज बिले भरली आहेत तरीही रिडींग प्रमाणे हि पुर्ण बिले भरावी लागतील असे महावितरण कंपनी कडून सांगितले गेले. वीज ग्राहकांकडून अतिरिक्त रक्कम लादण्यात येत आहेत.

अगोदरच नागरिक कोरोना संकटाच्या लॉकडाऊनमुळे बेरोजगार व महागाईने त्रस्त झालेले आहेत. नागरिकांना तीन महिन्यांचा वीज बिल माफ करावा असे वारंवार सांगण्यात येत होते. परंतु हे दूरच पण रिडींग शिवाय वीज बिल ग्राहकांनी पाच महिन्यांचा बिल भरला आहे. तरी तुम्हांला रिडींग प्रमाणे वीज बिल भरावे लागेल असे सांगितले जात असल्याची तक्रार पूढे येत आहे. पाली येथील रंजना विश्वनाथ माळी यांचे मार्च ते जुलै महिन्यांची रिडींग ४८७९ एवढी होती म्हणजे पाच महिन्यांची एकच असतांना यांनी १६६० रु. वीज बिल भरलेला आहे. नंतर त्यांचे ५०४८ या रिडींग प्रमाणे १९९ युनिटचा पाच महिन्यांचा वीज बिल आला आहे. त्यांनी भरेला वीज बिलामधुन माझी रक्कम कमी करुन द्यावी अशी मागणी उपकार्यकारी अभियंता पाली यांच्याकडे केली असता तुम्ही भरलेले बिल कमी होणार नाही. हे वीज बिल तुम्हांला भरावे लागेल असे सांगून विज बिल ग्राहकाची फसवणुक केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याने वीज धारकांच्यात एकच खळबळ उडाली आहे.

आधीपासूनच कोरोना संकट त्यात निसर्ग चक्रीवादळामुळे रायगडमधील वीज हि २० ते २५ दिवस बंद झाली होती. परंतु वीज बिले हि कमी केली गेली नाहीत. तर वीज बिले अंदाजे दिल्याने ग्राहकांना अतिरिक्त रक्कम त्यावर त्यांचे विविध आकारणी कर भरावी लागत आहेत. आशा रायगड जिल्हयातुन रोज अनेक तक्रारी पूढे येत असुन याकडे संबंधीत लक्ष देणे गरजेचे आहे असे विज बिल ग्राहकांकडून बोलले जात आहे.

ग्रामीण भागातील तीन महिन्यांची वीज बिले शासनाने माफ करावी

गेली सहा ते सात महिन्यांपासून ग्रामीण भागातील जनतेला कोरोनाशी युद्ध करावा लागत आहे. त्यातच मार्च ते जुलै हे चार महिने तर अक्षरशः लॉकडाऊन मध्ये रोजनदारी करणाऱ्यांवर मोठी संक्रात निर्माण झाली आहे. महागाईचा बडगा कायम आहे विविध पातळीवर ग्रामीण भागातील जनतेची वीज बिले माफ करण्यासाठी अनेकांनी मागणी केली तरी देखील वीज वितरक कंपनीने वीज बिल माफ करणे सोडाच मात्र त्यांच्या जखमेवर मीठ चोळत वाढीव वीज बिल देत रक्कम भरण्याची मागणी करत आहेत तरी शासनाने ग्रामीण भागातील जनतेची लॉक डाऊन काळातील वीज बिल माफ करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते घनश्याम जांभेकर व तुकाराम सानप यांनी केली आहे,