रायगडमधील संगणक परिचालकांचे ‘आरोग्य सेतू’ ॲपबाबत मार्गदर्शन करण्यात महत्वाचे योगदान

म्हसळा :कोरोना व्हायरसच्या संकटाने अवघ्या विश्वाला हादरून सोडले असून कोरोनाच्या प्रतिबंधासाठी शासनाच्या वतीने विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून कोरोनाला हरविण्यासाठी केंद्र व

 म्हसळा : कोरोना व्हायरसच्या संकटाने अवघ्या विश्वाला हादरून सोडले असून कोरोनाच्या प्रतिबंधासाठी शासनाच्या वतीने विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून कोरोनाला हरविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार यांनी कडक पावले उचलली आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी ‘आरोग्य सेतू’ ॲप तयार केले आहे. .रायगड जिल्हा संगणक परिचालक संघटनेने हे ॲप जिल्ह्यातील विविध सहकारी संस्था, सेवाभावी संस्था मित्र मंडळ, गावातील तरुण, ग्रामपंचायत कार्यालय, सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय तसेच प्रत्येक नागरिकाने डाऊनलोड करावे, असे आवाहन तर केले आहेच शिवाय संगणक परिचालक या अॅपविषयी लोकांना मार्गदर्शनही करत आहेत.

 आरोग्य सेतू या मोबाईल ॲपच्या माध्यमातून कोरोना विषाणूचे संक्रमण ओळखण्यासाठी मदत होणार असुन या  ॲपमध्ये कोरोना विषयीची लक्षणांची माहिती देण्यात आली आहे. मोबाईलमध्ये अँप इंस्टॉल केल्यावर ॲप्लिकेशन विविध माहितीचे संकलन करणे व आवश्यक त्या सूचनेचे प्रसारण करते. या  ॲपद्वारे कोरोना विषयीची जोखीम कितपत आहे. याबाबत माहिती मिळणे शक्य होणार आहे. ‘आरोग्य सेतू’ ॲप कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्यानंतर तुम्हाला अलर्ट करण्याचे काम करेल. तसेच हे ॲप युजर्सच्या ब्लू टूथ, मोबाईल नंबर आणि लोकेशनवरून तो व्यक्ती कोरोना बाधितांच्या संपर्कात आला तर नाही ना? ती व्यक्ती कोरोना बाधित आहे की नाही ? या बाबी तपासून हे ॲप गुगल वर दिलेल्या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. नागरिकांनी कोरोनाशी सुरू असलेल्या या युद्धात एकजुटीने सहभागी होऊन कोरोना विषाणूंचा संक्रमण रोखण्यासाठी लढा द्यावा. ॲप डाऊनलोड करून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन रायगड जिल्हा संगणक परिचालक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान  देशावर आलेल्या संकटात रायगड जिल्ह्यातील संगणक परिचालक ॲप इन्स्टॉल करण्यापासून कोरोनाच्या लढाईत वरिष्ठांच्या सूचनेनुसार मिळेल ते काम करत आहेत. या ॲपच्या मदतीने आपण स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे आणि आपल्या मित्रपरिवाराचे रक्षण करू शकतो आणि कोव्हीड – १९ सोबत लढण्याच्या प्रयत्नात आपल्या भारत देशासाठी मदत करू शकतो, असे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे राज्यसचिव तथा रायगड जिल्हाध्यक्ष मयुर कांबळे यांनी सांगितले आहे. संघटना या अॅपबाबत जनजागृतीचे काम करत आहे, ही चांगली बाब आहे.