teacher

रविंद्र कान्हेकर, रोहा: राज्यात बालकाचा सर्वागीण विकास याप्रमाणे राज्यशासनाने इतर शाळांप्रमाणे आदिवासी विकास विभागा (Department of Tribal Development) तील शासकीय आश्रम शाळांमध्येही (Government Ashram Schools) आश्रम शाळा क्रीडा शिक्षक/मार्गदर्शक हे पद ११ महिने करारावर मानधन तत्वावर भरण्यात आले.

हे पद नियुक्तीच्या काळात शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये दैनिक वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आली होती. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी, आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी अशा त्रिस्तरीय समितीने राज्यातील ५०२ आश्रमशाळा क्रीडा शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या. त्याप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये पुन्हा नव्याने ११ महिने करारावर नियुक्ती आदेश देण्यात आले होते. मात्र शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील जानेवारी महिण्यापासून क्रीडा शिक्षकांना (physical education teacher) मानधनही (Honorarium) अदा करण्यात आलेले नाही.

मानधन अदा न करण्यात आल्याने या शिक्षकांच्या कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली आहे. यावर महविकास आघाडी सरकारने (mahavikas aghadi government) विचार करुन लवकरात लवकर या शिक्षकांना मानधन व नियुक्ती आदेश द्यावेत अशी मागणी राज्यभरातून क्रीडा शिक्षक करीत आहेत.

महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्र. शा.आ.शा-२०१८/प्र. क्र.८४/का.१३ दिनांक ६ मार्भ २०१८ नुसार शासकीय आश्रम शाळांमध्ये कंत्राटी क्रीडाशिक्षक/ क्रीडा मार्गदर्शक कंत्राटी पद्धतीने शासनाने मान्यता देण्यात आली होती, त्यानसार महाराष्ट्रात आदिवासी विकास विर्भागांअंतर्गत येणा-या ५०२ शासकीय आश्रम शाळांमध्ये कंत्राटी क्रीडा शिक्षक/क्रीडा मार्गदर्शक हे कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आले होते, त्यानसार ११ महिने, ११ महिने नियुक्त्या देण्यात आल्या. मात्र, शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहेत मात्र कंत्राटी क्रीडा शिक्षकांना नियुक्त्या अद्याप देण्यात आल्या नाहीत.

याशिवाय शासनाने अनुदान दिले नसल्याने जानेवारी पासून शिक्षकांचे मानधनही काढण्यात आले नाहीत. त्यामुळे आश्रम शाळा क्रीडा शिक्षकांच्या कुटुंबावर उपासमारिची वेळ आली आहे. कोरोना महामारीच्या काळात क्रीडा शिक्षक उपयुक्त ठरू शकतात. विद्यार्थ्याची रोगप्रतिकार शक्ती वाढवीण्यासाठी योगा, कवायती आदिंसाठी क्रीडा शिक्षक उपयुक्त ठरतील. मात्र सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये कंत्राटी क्रीडा, कला व संगणक शिक्षकांना नियुक्ती आदेश दिलेले नाहीत.

शासनाची नेमकी भूमिका काय?

हिवाळी आधिवेशनात दिलेला शब्द राज्यमंत्री बच्चू कडू पाळणार काय? तसेच कोरोना महामारीत क्रीडा शिक्षकांना विरोधी पक्षातील आमदार व सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांनी अधिवेशन चालू झाल्यावर आम्ही आपणास जानेवारी पासून शिल्लक राहिलेले मानधन अदा केले जाईल असे आश्वासन दिले होते ते पाळणार का नाही? असा सवाल क्रीडा शिक्षकांकडून विचारण्यात येत आहे.

शासन निर्णय

कंत्राटी शिक्षकांनी पालकमंत्री संजय राठोड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, आदिवासी विभागाने रज्यशासनाच्या ३१ मार्च २०२० च्या शासन निर्णयानुसार यात कोणत्याही कंत्राटी शिक्षकाला कमी केले जाणार नाही, अशी हमी दिली आहे. तरीसुद्धा याकडे दुर्लक्ष करीत अद्याप पुननियुक्ती आदेश का दिले गेले नाहीत असा संतप्त सवाल राज्यभरातील क्रीडा शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.