कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आष्टे लॉजिस्टिक कंपनी बंद ठेवण्याचे तहसीलदारांचे आदेश

पनवेल:पनवेल तालुक्यातील आष्टे लजिस्टिक कंपनीतील आठ कामगारांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पनवेलच्या तहसीलदारांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आजपासून पुढील

पनवेल: पनवेल तालुक्यातील आष्टे लजिस्टिक कंपनीतील आठ कामगारांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पनवेलच्या तहसीलदारांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आजपासून पुढील आदेश देईपर्यंत कंपनी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

 पनवेल तालुक्यात कोरोनाच संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. पनवेल महापालिका क्षेत्राबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. पनवेल ग्रामीणमध्ये आतापर्यंत १२८ कोरोनाचे रुग्ण सापडले असून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कसालखंड, वहाळ आणि अष्टा येथील रुग्णांची संख्या वाढत असून त्यातील बहुसंख्य व्यक्तीं आष्टे लॉजिस्टिक कंपनीत कामाला असल्याचे दिसून आले आहे. त्यांना कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला असावा, असा निष्कर्ष निघाला आहे. आष्टे लॉजिस्टिक कंपनीतील आठ कामगारांना कोरोनाची लागण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी ही कंपनी बंद करण्याची मागणी केली होती. त्यामुळे पनवेल तहसीलदारांनी कोरोंना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुढील आदेश देईपर्यंत कंपनी बंद ठेवण्याचे व्यवस्थापनाला आदेश दिले आहेत.