सहाय्यक पोलीस फौजदार प्रदीप पाटील सेवानिवृत्त

सन १९८५ ते १९९२ या साली वागळे इस्टेट पोलिस ठाणे (शहर) सन १९९२ ते १९९७ भोईवाडा शहर पोलीस ठाणे १९९७ ते २००१ नारपोली पोलीस ठाणे भिवंडी शहर. २००१ ते २००६ पोलीस मुख्यालय अलिबाग-रायगड. २००८ ते २०१४ पेण पोलीस ठाणे आणि सन २०१४ ते ३१-८-२०२० पर्यंत पोलीस मुख्यालय अलिबाग-रायगड येथे सेवा करून ३१ ऑगस्ट २०२० रोजी सेवानिवृत्त झाले.

सुतारवाडी – श्री प्रदीप जोमा पाटील हे पोलीस दलात (In the police force) ३७ वर्षे ६ महिने दीर्घ यशस्वी सेवा करून सेवानिवृत्त (Retired) झाले. त्यांनी आज तगायत सन १९८३ ते १९८५ या काळात तळोजा पोलीस ठाणे(Taloja Police Thane), सन १९८५ ते १९९२ या साली वागळे इस्टेट पोलिस ठाणे (शहर) सन १९९२ ते १९९७ भोईवाडा शहर पोलीस ठाणे १९९७ ते २००१ नारपोली पोलीस ठाणे भिवंडी शहर. २००१ ते २००६ पोलीस मुख्यालय अलिबाग-रायगड. २००८ ते २०१४ पेण पोलीस ठाणे आणि सन २०१४ ते ३१-८-२०२० पर्यंत पोलीस मुख्यालय अलिबाग-रायगड येथे सेवा करून ३१ ऑगस्ट २०२० रोजी सेवानिवृत्त झाले. शालेय जीवनात त्यांनी स्नेहसंमेलनात पोलिसाची भूमिका “पोलिसांच्या शोधात खुनी” या नाटीकेत केली होती. या त्यांच्या भूमिकेला अनेक पारितोषिकेही मिळाली होती.

लहानपणापासून त्यांना पोलीस होण्याची इच्छा होती. त्यांचा खाकी वर्दीवर विलक्षण प्रेम आहे. आपले शिक्षण पूर्ण करून योग्य ते प्रशिक्षण घेऊन १९८३ ला पोलिस सेवेत रुजू झाले. नोकरी करत असताना सातत्याने धडपडत, गुन्हेगारांचा शोध, दिलेले काम इमानइतबारे करून नावलौकिक मिळविले. त्यांच्या धडपडीची, तत्परतेची आणि प्रामाणिक पणाची दखल घेऊन सहाय्यक पोलिस फौजदार म्हणून नियुक्ती केली. शालेय जीवनात पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरविले आणि पोलिस दलात अखंड सेवा करून ३१ ऑगस्ट २०२० रोजी सेवानिवृत्त झाले. अशा हरहुन्नरी प्रदीप पाटील यांना अनेक पोलिसांनी, मित्र परिवाराने पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.