मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर खोपोलीनजीक एका कंटेनरचे चार ते पाच वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून इतर पाच जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळतेय. जखमींच्या जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठीी दाखल करण्यात आले आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघातांची मालिका सुरूच आहे. मध्यरात्री खोपोलीजवळ झालेल्या भीषण अपघातात अनेक वाहनांचा समावेश होता. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर खोपोलीनजीक एका कंटेनरचे चार ते पाच वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून इतर पाच जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळतेय. जखमींच्या जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठीी दाखल करण्यात आले आहे.
मध्यरात्रीच्या सुमाराला कंटेनरने एका कारला धडक दिली. मात्र त्याचवेळी इतर काही गाड्याही यावर येऊन आदळल्या. कंटेनरचं नियंत्रण सुटल्यामुळे त्याची अनेक वाहनांना धडक बसली. या अपघातात पाच जण ठार झाले. अचानक झालेल्या या अपघातामुळे एक्सप्रेस हायवेवर काही काळ वाहतूक खोळंबली होती.
Maharashtra: Five killed and at least five injured in a collision between multiple vehicles on Mumbai – Pune Expressway near Khopoli last night. The injured were taken to a hospital. pic.twitter.com/itblPUEE5X
— ANI (@ANI) February 16, 2021
महामार्ग पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचत जखमींना रुग्णालयात हलवलं. जखमींवर सध्या उपचार सुरू असून त्यातील काहीजणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.