जनतेच्या आशिर्वादामुळे मतदारसंघाची सेवा करण्यासाठी हजर : भरतशेठ गोगावले

गेल्या दीड महिना डाव्या पायाला झालेल्या जखमेवर मुंबई (Mumbai) येथे उपचार करण्यासाठी गेलेले महाड पोलादपूर (Poladpur) माणगांवचे आमदार भरतशेठ गोगावले हे आपल्या निवासस्थानी परतले असून केवळ जनता पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या प्रार्थने व आशिर्वादामुळेच आपण बरे होऊन मतदार संघातील जनतेच्या सेवेसाठी हजर झालो आहोत असे आ. भरतशेठ गोगावले (Bharatsheth Gogavale) यांनी ढालकाठी येथील शिवनेरी बंगल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

महाड : गेल्या दीड महिना डाव्या पायाला झालेल्या जखमेवर मुंबई (Mumbai) येथे उपचार करण्यासाठी गेलेले महाड पोलादपूर (Poladpur) माणगांवचे आमदार भरतशेठ गोगावले हे आपल्या निवासस्थानी परतले असून केवळ जनता पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या प्रार्थने व आशिर्वादामुळेच आपण बरे होऊन मतदार संघातील जनतेच्या सेवेसाठी हजर झालो आहोत असे आ. भरतशेठ गोगावले (Bharatsheth Gogavale) यांनी ढालकाठी येथील शिवनेरी बंगल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी सेनेचे महाड तालुका प्रमुख सुरेश महाडीक, संपर्क प्रमुख विजय सावंत, युवा सेनेचे दक्षिण रायगड जिल्हा अधिकारी विकास गोगावले, महाड शहर अधिकारी सिध्देश पाटेकर, राजू जाधव, इम्रान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. गेले दिड महिना पायाला जखम झाली असल्याने आणि डायबेटीसचा त्रास असल्याने ही जखम लवकर भरत नसल्याने त्याच बरोबर जखमे जवळील नस दबली गेल्याने मुंबई येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार व शस्त्रक्रिया करावी लागली असे आ. गोगावले यांनी सांगितले.

या दरम्यान आपल्या पाठमोऱ्या आपल्या आजाराबाबत अनेक उलट सुलट चर्चा अपप्रचार सुरु होते मात्र त्याची दखल आपण घेत नसल्याचे आ. गोगावले यांनी स्पष्ट केले. या उपचारादरम्यान मतदार संघातील जनता कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आपल्या निवडणुकीच्या वेळी जेवढे नवस व प्रार्थना केल्या नव्हत्या, तेवढे नवस व प्रार्थना केल्या. त्यामुळेच आपण सुखरूप या आजारातून बाहेर पडलो. ५७ वर्षाचे आयुष्यात आपण इतक्या दिवस हॉस्पिटल मध्ये राहीलो नाही. शुगर मुळे काय होऊ शकते याचे जिवंत उदाहरण सर्वासमोर असून शुगर चा त्रास असणार्यांयनी काळजी घ्यावी असे आवाहन आ गोगावले यांनी केले. गेली अनेक वर्षा पासून नादुरूस्त असणाऱ्या दापोली पंदेरी पुलाची मागणी दीड वर्षा पूर्वी युती सरकार असताना आपण केली होती. नाबाड अंतर्गत आपल्या मागणी नुसार बिरवाडी, दादली, टोळ ,आंबेत ,मांघरूण- दापोली- पंदेरी अशा ७ पुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे दापोली पंदेरी पुल हा आपल्या मागणीचे यश आहे असे खोटे कुणी बोलू नये असा टोला कुणाचेही नाव न घेता आ गोगावले यांनी लगावला .

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ६ रस्ते, नगर विकास खात्यामार्फत महाड तालुक्यासाठी ४ कोटी ४७ लाख, पोलादपूर साठी ३ कोटी, माणगांव व तळासाठी प्रत्येकी १ कोटी निधी आपल्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला आहे. महाड तालुक्यासाठी पाटबंधारे खात्याची महामार्गालगत असणारी जागा संपादित करून प्रशासकिय भवन, पोलादपूर येथे प्रशासकिय भवन करण्यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे त्याच प्रमाणे महाड येथे हेलिपॅड ची व्यवस्था व एनडीआरएफ चा तळ कायम स्वरूपी महाड येथे असावा याची मागणी मुख्य मंत्र्यांकडे आपण केली आहे असे आ. गोगावले यांनी सांगितले. पोलादपूर तालुक्यातील तुर्भे खोंडा परिसरात पंचतारांकित एमआयडीसी आणण्याचा आपला प्रयत्न असून येथील जनतेचा यापूर्वी या एमआयडीसीसाठी असणारा विरोध मावळला असून त्यांच्याशी चर्चा करूनच आपण हा पाठपुरावा करीत आहोत असे गोगावले यांनी सांगितले.

मात्र धामणे परिसरात येऊ घातलेल्या कंपन्यांना स्थानिकांचा असणारा विरोध पाहता आपण स्थानिकांच्या सोबत असल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने आणलेले कामगार विधेयक हे कामगार विरोधी असल्याने या विधेयकाला आपला विरोध असून भारतीय कामगार सेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून याबाबत जी भूमिका घेण्यात येईल, त्याची अंमल बजावणी करण्यात येईल असे स्पष्ट करीत महाड विधान सभा मतदार संघात असणाऱ्या कारखान्यांबाबत आपली भूमीका स्पष्ट करताना कारखाना सुरु राहून कामगार जगला पाहिजे मात्र कामगारावर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही असे आ. गोगावले यांनी सांगितले.

महाड उत्पादक संघाचा (MMA)विशेष सत्कार करणार : महाड तालुक्यात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाड औद्योगिक वसाहती चे प्रतिनिधित्व करणाऱ्या एम. एम. ए. ने पुढाकार घेत इतर कारखान्याच्या मदतीने अनेक अडचणींना सामोरे जात अतिशय सुसज्ज असे कोविड उभारले. आतापर्यंत या कोविड सेन्टर मधून जवळपास ६०० रुग्णाचे प्राण वाचविण्यात यश आले. या कोविड सेन्टर मध्ये काम करणाऱ्या सर्व डॉक्टर, नर्स सफाई कर्मचारी तसेच २४ तास अथक परिश्रम करणाऱ्या एम एम ए च्या सर्व सदस्याचा आपण लवकरच यथोचित असा सत्कार करणार आहोत.