covid hospital

पनवेल : जिल्ह्यामध्ये सर्व खासगी व शासकीय कोविड-१९ रुग्णालयांमध्ये उपलब्ध ऑक्सिजन बेड व आय.सी.यू. बेडबाबत नियंत्रण करण्यासाठी तहसिलदार कार्यालयामध्ये व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष(control room) कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्यानुसार रायगड जिल्ह्यात(raigad district) कोविड-१९ रुग्णांसाठी सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन बेड  व आय.सी.यू. बेडची माहिती नागरिकांना मिळण्यासाठी प्रत्येक तहसिलदार कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आलेला आहे. या क्रमांकावर संपर्क केल्यास जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या बेडची माहिती(information of available bed) उपलब्ध होवू शकेल.
तहसिल कार्यालय, अलिबाग-०२१४१-२२२०५४, तहसिल कार्यालय, पेण-०२१४३-२५२०३६, तहसिल कार्यालय, मुरुड-०२१४४-२७४०२६, तहसिल कार्यालय, पनवेल-०२२-२७४५२३२९, तहसिल कार्यालय, उरण-०२२-२७२२२३५२, तहसिल कार्यालय, कर्जत-०२१४८-२२२०३७, तहसिल कार्यालय, खालापूर-०२१९२-२७५०४८, तहसिल कार्यालय, माणगाव-०२१४०-२६२६३२, तहसिल कार्यालय, तळा-७०६६०६९३१७, तहसिल कार्यालय, रोहा-०२१९४-२३२२३२, तहसिल कार्यालय, पाली-०२१४२-२४२६६५, तहसिल कार्यालय, श्रीवर्धन-७२४९५७९१५८, तहसिल कार्यालय, म्हसळा०२१४९-२३२२२४, तहसिल कार्यालय, महाड-०२१४५-२२२१४२, तहसिल कार्यालय, पोलादपूर-०२१९१-२४००२६, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग-०२१४१-२२२११८

गरजू नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.