पनवेलमधल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पुस्तक वाचून साजरी केली बाबासाहेबांची जयंती

पनवेल : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती काल नवीन पनवेलमधील डी.डी.विसपुते महाविद्यालयाकडून वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन असल्याने प्रथमच पुस्तक

 पनवेल : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती काल नवीन पनवेलमधील डी.डी.विसपुते महाविद्यालयाकडून वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन असल्याने प्रथमच पुस्तक वाचन करून ऑनलाईन जयंती साजरी करण्यात आली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती मंगळवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे साजरी झाली. विसपुते महाविद्यालयात आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन  धनराज विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांनी विद्यार्थ्यांना दिवसभर कोणतेही एक पुस्तक वाचून त्याचे फोटो पाठविण्यास सांगितले होते. महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांना झुमची लिंक देऊन ८७ विद्यार्थ्यांच्या व स्टाफच्या ऑनलाईन उपस्थितीत ही जयंती साजरी करण्यात आली.स्क्रीनवर टप्याटप्प्याने बाबासाहेबांचे अनेक फोटो प्रदर्शित करण्यात आले. प्रा.नेहा म्हात्रे यांनी प्रास्ताविक केल्यावर विद्या पाटील व हर्षाली ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले.यानंतर प्रा.विनायक लोहार यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्याची महती विद्यार्थ्यांसमोर सादर केली व सर्वांना एक नवी दिशा दिली.यानंतर प्रा.विजय मोरे यांनी सर्वांचे आभार मानले.