pritam mhatre

कळंबोली येथील टियारा हॉल क्वारंटाईन सेंटरमध्ये(quarantine centre) निकृष्ट दर्जाचे जेवण( bad food) दिले जात असल्याच्या तक्रारी आल्याने नुकतेच कोविडवर मात करून आलेल्या विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी या ठिकाणची पाहणी केली. कोविड सेंटरवर मिळणाऱ्या निकृष्ठ दर्जाच्या जेवणावर आक्षेप घेत आयुक्तांकडे दोषींवर कारवाई करण्याची मागणी(demand totake action) केली.

पनवेल : कळंबोली येथील टियारा हॉल क्वारंटाईन सेंटरमध्ये(quarantine centre) निकृष्ट दर्जाचे जेवण( bad food) दिले जात असल्याच्या तक्रारी आल्याने नुकतेच कोविडवर मात करून आलेल्या विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी या ठिकाणची पाहणी केली. कोविड सेंटरवर मिळणाऱ्या निकृष्ठ दर्जाच्या जेवणावर आक्षेप घेत आयुक्तांकडे दोषींवर कारवाई करण्याची मागणी(demand totake action) केली.

पनवेल महानगरपालिकेचे ११५ बेड उपलब्ध असणाऱ्या कळंबोली येथील टियारा हॉल क्वारंटाईन सेंटरमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याची तक्रार येताच विरोधी पक्ष नेते यांनी या क्वारंटाईन सेंटरमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. कोविड निगेटिव्ह होताच पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे हे पुन्हा सामाजिक कार्यात सक्रिय झालेले आहेत. कळंबोली येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये पाहणी केली असता यावेळी जेवणात कधी झुरळ तर कधी केस सापडत असल्याचे रुग्णांकडून समजले. यावर विरोधी पक्ष नेते यांनी येथील संबंधित कर्मचाऱ्यांना धारेवर धरत आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सदर विषयात हस्तक्षेप करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

इंडिया बुल्स येथे देखील निकृष्ट दर्जाचे जेवण येथे पुरविल्याच्या आरोपाखाली कारवाई करण्यात आली होती. निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याने रुग्णाच्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे जेवण पुरवणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केलेली आहे. यावेळी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या सोबत शेकाप चिटणीस गणेश कडू, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक रवींद्र भगत, सारिका भगत व उज्वला पाटील यावेळी उपस्थित होत्या.