बामर लॉरी यार्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कंटेनर; भर रस्त्यात कंटेनरची थप्पी

उरण: कोरोनामुळे देशात व राज्यात लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्वच ठप्प झाल्याने वाहतूक की बंद आहे. त्यामुळे कंटेनरची आयात निर्यात बंद असल्याने बामर लॉरी यार्डमध्ये कंटेनर ठेवण्यासाठी जागा नसल्याने

उरण:  कोरोनामुळे देशात व राज्यात लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्वच ठप्प झाल्याने वाहतूक की बंद आहे. त्यामुळे कंटेनरची आयात निर्यात बंद असल्याने बामर लॉरी यार्डमध्ये कंटेनर ठेवण्यासाठी जागा नसल्याने यार्डच्या बाहेर कंटेनरची थप्पीच्या थप्पी लागली आहे. मात्र कंटेनर ठेवण्यासाठी जागेची परवानगी घेण्यात आली का? उद्या काही घटना घडली तर जबाबदारी कोणी घेईल अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे. लॉकडाऊनमुळे काही राज्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू असलेल्या जेएनपीटी बंदरात जलमार्गाने जहाजाद्वारे आयात-निर्यात सुरू आहे. मात्र जेएनपीटी बंदरातून बाहेर आलेले कंटेनर यार्डमध्ये ठेवण्यात येत आहेत. पण यार्डमध्ये ठेवण्यात आलेले कंटेनर लॉकडाऊनमुळे नेण्यात येत नाही. यामुळे बामर लॉरी यार्डची कंटेनर ठेवण्याची क्षमता संपली आहे. ही ओव्हरलोड झाल्याने आता कंटेनर हे बामर लॉरी यार्डच्या कंपाऊंडबाहेर थप्पीच्या थप्पी बाहेर लावून ठेवण्यात आली आहे. हे जवळ जवळ २०० ते २५० कंटेनर असल्याची शक्यता कामगार वर्गानी व्यक्त केली. याबाबत कंपनी प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही.

या बामर लॉरी यार्डच्या बाहेर कंटेनर ठेवण्यासाठी कंपनीने परवानगी घेतली का? असा सवाल या निमित्ताने उभा राहत आहे. कारण ज्या ठिकाणी कंटेनर ठेवण्यात आले. त्याठिकाणी एखादी गाडी जरी उभी राहिली तरी लगेच कारवाईचा बडगा उगारला जातो. मग कंटेनर वर कारवाई करण्यात आली का? तसेच हे कंटेनर अनेक भागातून आले आहेत. एखादया कंटेनरची दुर्घटना घडली तर जबाबदारी कोणी घ्यायची अशी चर्चा स्थानिक ग्रामस्थांत सुरू आहे. तरी प्रशासनाने याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.