खोपोलीतील बँक ऑफ इंडीयाच्या शाखेमध्ये इंटरनेट खंडीत, एटीएमही बंद – अनेक तास रांगेत उभे राहूनही बँक व्यवहार होत नसल्याने नागरिक त्रस्त

शिळफाटा : बँक ऑफ इंडिया बँकेतील इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असल्याने इंटरनेट सेवेअभावी व्यवहार ठप्प झाले आहेत.तसेच बँकेत कामगारांची पगार काढण्यासाठी तसेच पेन्शनधारक अबालवृध्द अनेक तास रांगेत

 शिळफाटा : बँक ऑफ इंडिया बँकेतील इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असल्याने इंटरनेट सेवेअभावी व्यवहार ठप्प झाले आहेत.तसेच बँकेत कामगारांची पगार काढण्यासाठी तसेच पेन्शनधारक अबालवृध्द अनेक तास रांगेत उभे राहत आहेत. इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत असलेल्या कारणामुळे खातेदारांना रिकाम्या हाती परतावे लागत असल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे.

खोपोली शहरातील बँक ऑफ इंडिया बँकेत खालापूर तालुक्यातील कामगार,पेन्शनधारक व्यापाऱ्यांसह हजारो खातेदार असून आपल्या खात्यातील रक्कम काढून बाजारहाट करण्याच्या हेतून ग्रामीण भागातून नागरिक येत असून बँकेच्या बाहेर लांबच लांब रांगेत अनेक तास उभे राहत आहेत. मात्र बँकेतील वारंवार खंडित होणाऱ्या इंटरनेट सेवेमुळे सर्व व्यवहार ठप्प होत असल्याने खातेदारांमधून कमालीचा संताप व्यक्त होत आहे.बँक ऑफ इंडिया बँकेत बहुसंख्य पेन्शन धारकांची खात्यात १ तारखेनंतर पेन्शन जमा होत असल्याने गोळ्या औषधांसाठी लागणारे पैसे काढण्यासाठी बँकेबाहेर सकाळपासून अबालवृध्द उभे राहत आहेत.अनेक तास रांगेत सरकत बँकेच्या प्रवेशद्वारासमोर गेले असता अचानक इंटरनेट सेवा बंदचा फलक लावून उद्या येण्यासाठी कर्मचारी सांगताच खातेदारांची मोठी हिरमोड होत आहे.यादरम्यान दिवसभर बँक कर्मचारीदेखील बेजार होत आहेत. त्यातच  बँकेचे एटीएमही वारंवार बंद असते. त्यामुळे पैसे काढण्यासाठी ग्राहक बँकेत गर्दी करीत आहेत.पावसाळ्यात शेती हंगामाचे दिवस असून शेतकरी वर्गास पैशांची अवश्यकता आहे. त्यामुळे बँक व्यवस्थापकांनी इंटरनेट सुविधा चांगली करावी अन्यथा पुढील चार महिने पावसाळ्यात ग्राहकांना पैसे काढण्यासाठी भर पावसात भिजत उभे राहावे लागेल.