कोरोना रुग्णांसाठी देवांशी इन येथे १०० बेडची व्यवस्था

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णाची संख्या एक हजार पेक्षा जास्त झाली असल्याने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षता घेता पनवेल महानगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी कोरोना रुग्णांची

 पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णाची संख्या एक हजार पेक्षा जास्त झाली असल्याने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षता घेता पनवेल महानगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी कोरोना रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पालिकेच्या वतीने कळंबोली येथील देवांशी इन येथे १०० बेडची व्यवस्था करण्यात येत असुन लवकरच त्या ठिकाणी रुग्णांची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याची पाहणी  मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ.कविता चौतमोल, आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त संजय शिंदे, तसेच महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी काल संध्याकाळी केली .