bird in mangav

हिवाळा गुलाबी थंडीच्या मोसमात(winter season) अनेक पक्षी युरोप खंडातुन तसेच टर्की आणि इराण सारख्या देशातून हजारो किलोमीटर स्थलांतरीत(birds migration) होत असतात. काळ्या डोक्याच्या भारीट पक्ष्यांचे अर्थात परदेशी पाहुण्यांचे थवेच्या थवे पहिल्यांदाच माणगाव तालुक्यात अवतरले आहेत.

    हिवाळा गुलाबी थंडीच्या मोसमात(winter season) अनेक पक्षी युरोप खंडातुन तसेच टर्की आणि इराण सारख्या देशातून हजारो किलोमीटर स्थलांतरीत(birds migration) होत असतात. पक्षीप्रेमींच्या कुतूहलाचा निरिक्षणाचा हा आवडीचा कालावधी.अशातच काही स्थलांतरीत(migrated birds) काळ्या डोक्याच्या भारीट पक्ष्यांचे अर्थात परदेशी पाहुण्यांचे थवेच्या थवे पहिल्यांदाच माणगाव तालुक्यात अवतरले आहेत. वन्यजीव अभ्यासक, छायाचित्रकार शंतनु कुवेसकर यांना ते तालुक्यातील भातशेतीच्या परिसरात आढळून आले आहेत. मुख्यत्वे शेतीच्या प्रदेशातच आढळणारे त्यांचे छोटे-छोटे तसेच अगदी शेकडोंच्या संख्येने असलेले थवे दरवर्षी हिवाळ्यात पाहायला मिळतात. मात्र एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात हजारो-लाखोंच्या संख्येमध्ये त्यांचे दिसून येणे हा फार दुर्मिळ योग आहे.

    काळ्या डोक्याचा भारीट हा पक्षी चिमणीसारखा सडपातळ दिसतो, याची शेपटी लांब आणि दुभागलेली असते. नरांचा रंग पोटाकडून गव्हाळी सोनेरी पिवळा तर पाठीकडे लाल-भुरा असतो, नरांच्याच डोक्यावर काळी टोपी असते. मादा नरांसारख्या आकाराच्याच पण फिकट गव्हाळी रंगाच्या असतात. हे पक्षी थव्याने गवताळ व शेतीच्या प्रदेशात आढळतात, जमिनीवरील विविध प्रकारचे धान्य व गवताचे बिज खातात. दरवर्षी हे पक्षी पश्चिम आणि मध्य भारतात राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तसेच कर्नाटक या भागांत स्थलांतरित हिवाळी पाहुणे असतात. या पक्षांचा आकाशातील विहंगम विहार बघून डोळ्यांचे पारणे फिटते. माणगाव तालुक्यात इको टूरिझम अर्थात पर्यावरण पूरक पर्यटनाचे दृष्टीकोनातून ही आनंदाची बाब असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.