बिरवाडीमध्ये कोरोनाबाधित महिला आढळल्याने प्रभाग क्रमांक ५ चा काही भाग कोरोनाबाधित क्षेत्र घोषित

अलिबाग : महाड तालुक्यातील बिरवाडी येथील साळवी कॉम्प्लेक्स येथे एक व्यक्ती कोरोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोनबाधित रुग्ण रहात असलेल्या प्रभाग क्रमांक ५ मधील गणू सावंत मार्ग ते

 अलिबाग : महाड तालुक्यातील बिरवाडी येथील साळवी कॉम्प्लेक्स येथे एक व्यक्ती कोरोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोनबाधित रुग्ण रहात असलेल्या प्रभाग क्रमांक ५ मधील गणू सावंत मार्ग ते मधले आवाड येथील ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणारा रस्त्याचा दक्षिणेकडील भाग मधला आवाड टाकी कोंड, ज्ञानेश्वर मंदिराकडून अंतर्गत रस्ता ते जुना बैठक हॉलपर्यंत, जुना बैठक हॉल ते गजानन नथू सोलम मार्ग येथील महाड-मांघरुण मुख्य रस्ता हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील २८ दिवस हे क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. 

या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा रायगड आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.  या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५५ कलम ५१ व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ७१, १३९ तसचे भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.