खोपोलीत भाजयुमोने वाहिली शहिदांना श्रद्धांजली, चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची घोषणा

खालापूर - भारताच्या सीमेवर चीनने केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताचे २० सैनिक शाहिद झाले. या सैनिकांना भारतीय जनता युवा मोर्चातर्फे खोपोलीत श्रद्धांजली वाहण्यात आली. याचवेळी कार्यकर्त्यांनी चीनचा

 खालापूर – भारताच्या सीमेवर चीनने केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताचे २० सैनिक शाहिद झाले. या सैनिकांना भारतीय जनता युवा मोर्चातर्फे खोपोलीत श्रद्धांजली वाहण्यात आली. याचवेळी कार्यकर्त्यांनी चीनचा निषेध करताना, चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंगुलकर यांच्या नेतृत्वाखाली दीपक चौकात शनिवारी झालेल्या श्रद्धांजली कार्यक्रमाला माजी आमदार व भाजप नेते देवेंद्र साटम, जिल्हा भाजप महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनीताई पाटील, खोपोली शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल,परिवहन सभापती तुकारामशेठ साबळे, शहर सरचिटणीस हेमंत नांदे, ईश्वर शिंपी, दिलीप पवार, युवा मोर्चा शहर सरचिटणीस विनायक माडपे, मीडिया सेलचे राहुल जाधव, युवा नेते सचीन मोरे, जिल्हा चिटणीस सूर्यकांत देशमुख, जिल्हा सदस्या  सुरेखा गांधी, माजी शहर अध्यक्ष श्रीकांत पुरी, दिलीप निंबाळकर, विजय तेंडुलकर, पदाधिकारी संजय म्हात्रे, युवा मोर्चाचे शहर पदाधिकारी, पंकज पालांडे, सागर काटे, सिद्धेश पाटील यांसह अनेक युवा मोर्चाचे व भाजप चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.