भारतीय जनता युवा मोर्चाचा दहा दिवसांमध्ये हजार बाटल्या रक्त जमविण्याचा संकल्प

पनवेल : कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत असताना राज्यात मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज असल्याचे लक्षात घेऊन भारतीय जनता युवा मोर्चाने पुन्हा एकदा रक्त तुटवडा भरुन काढण्यासाठी दहा दिवसात

पनवेल : कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत असताना राज्यात मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज असल्याचे लक्षात घेऊन  भारतीय जनता युवा मोर्चाने  पुन्हा एकदा रक्त तुटवडा भरुन काढण्यासाठी दहा दिवसात हजार बाटल्या रक्त जमविण्याचा संकल्प केला असल्याची माहिती युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी दिली आहे. 

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेक रुग्णालयात आवश्यक असलेल्या रक्ताचा तुटवडा भासत असल्याचे विविध रक्तपेढ्या व हॉस्पिटलकडून सांगण्यात येत आहे. विशेष करुन थॅलेसेमियाच्या रुग्णांना रक्ताची वारंवार गरज लागते. भारतीय जनता पार्टीच्या युवकांची फळी अनेक समाजोपयोगी उपक्रमांत नेहमीच अग्रेसर आहे. भाजपा उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाने मार्च महिन्याच्या सुरुवातीला सोशल डिस्टन्सिंग पाळत मोठ्या प्रमाणात रक्तदान करुन विशेषत: टाटा कॅन्सर रुग्णालय रक्तपेढी, एमजीएम व रोटरी, खांदा काॅलनी येथील रक्तपेढयांना रक्ताचा पुरवठा केला. त्याचबरोबर गरजूंना अन्नधान्य वाटप, जेवण वाटप, प्रवासी पास काढून देण्यासाठी मदत इ. उपक्रमांत हिरहिरीने सहभाग नोंदवला होता .

 सध्या सगळीकडे रक्ताचा तुटवडा असल्याचे लक्षात घेता  आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसमवेत संपुर्ण ताकदीनिशी येता दहा दिवसांत १००० रक्त पिशव्यांचा संकल्प केला आहे. यासाठी २४ मे ते २ जून दरम्यान जिल्हाभर सोशल डिस्टन्सिंग पाळत रक्तदानाचे उपक्रम करण्यासंदर्भात योजना करुन कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या समवेत नागरिकांनीदेखील सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे. रक्ताची गरज असल्यास अथवा रक्तदानासाठी ईच्छुक असल्यास पनवेल शहर- रोहित जगताप – ८६९१९३०७०९, पनवेल ग्रामीण – आनंद ढवळे ९७७३९४७७७७, कामोठे – हर्षवर्धन पाटील ७७१५०४८१८१, कळंबोली – अमर ठाकूर – ८७६७१७१०१०, खारघर – विनोद घरत – ९८२१६९९०९०, कर्जत – प्रमोद पाटील – ९८५००५७३७८, खालापूर- प्रसाद पाटील – ९२७३२७००९४, खोपोली – अजय इंगूळकर ९५४५४७८६६६, उरण – शेखर पाटील – ९०८२५५३९५४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मयुरेश नेतकर यांनी केले आहे.