काेराेनाच्या महामारीत भाजपाचे राजकारण वाईट; नाना पटाेले यांचा आरोप

शेतकरी , बागायतदार , मच्छीमार आणि घरांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. अद्यापही रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसानग्रस्त भागात पंचनामे झालेले नसल्याचे समोर येत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने योग्य पंचनामे करावेत. त्या नुकसानीचा आढावा योग्य प्रस्तावासह सरकारला सादर करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांना केल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

    रायगड : काेराेनाच्या महामारीत मदत करायचे साेडून भाजप (BJP) केवळ राजकारण करण्यात मग्न आहे. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेबाबत काॅंग्रेसने पूर्व सुचना दिली हाेती. मात्र, माेदी सरकारने ते गांभिर्याने घेतले नाही. त्याचेच हे परिणाम असल्याचा आराेप काॅंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटाेले (Nana patole) यांनी अलिबाग येथे केला.

    रायगड जिल्ह्याला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी आज नाना पटोले दौऱ्यावर आले होते. यावेळी अलिबाग तालुक्यातील नवगाव, वरसोली , खानाव , वावे या नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा त्यांनी केला. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तौक्ते चक्रीवादळाने अपरिमित नुकसान केले आहे.