हुतात्मा दिनानिमित्त कोकण कडा मित्र मंडळ तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

गेल्या पंधरा वर्षापासून हुतात्मा दिनी तरुणांमध्ये देशाप्रती, समाजाप्रती असलेली राष्ट्रप्रेमाची भावना जागृत राहण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून रक्तदात्यांची संख्या कमी झाली आहे. परिणामी, देशभरात सर्वत्र रक्ताची कमतरता भासू लागली आहे.

महाड : हुतात्मा दिनाचे औचित्य साधून महाडमधील कोकण कडा मित्र मंडळ (Konkan Kada Mitra Mandal) तर्फे महाडच्या (Mahad) जनकल्याण रक्तपेढी मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन (Blood donation camp) करण्यात आले. गेल्या पंधरा वर्षापासून हुतात्मा दिनी तरुणांमध्ये देशाप्रती, समाजाप्रती असलेली राष्ट्रप्रेमाची भावना जागृत राहण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून रक्तदात्यांची संख्या कमी झाली आहे. परिणामी, देशभरात सर्वत्र रक्ताची कमतरता भासू लागली आहे.

रक्तदान शिबिराची संख्याही कमी झाली असून स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्यांच्या मनात ही असुरक्षितता निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे लोकांमध्ये रक्तदानाविषयी जनजागृती करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून लॉकडाऊनच्या काळात देखील कोकण कडा मित्र मंडळ महाडकडून वैद्यकीय साहित्यांचे वाटप करण्यात आले होते. श्रीवर्धन तालुक्यातील वादळ ग्रस्तांना देखील तातडीने मदत करत मोलाचे योगदान दिले होते.

मंडळातर्फे आज पुन्हा एकदा पुढाकार घेत सर्व प्रकारची खबरदारी सोशल डिस्टंसिंग सिनिटायझरचा वापर करत शासनाच्या नियम व निकषानुसार रक्तदान शिबिराचे आयोजन केले. कोकणकडा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार, जनकल्याण रक्तपेढीचे अध्यक्ष धनंजय परांजपे, संचालक शिवराज भागवत यांनी रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रकाश स्वामी जंगम, नितीन पावले, श्रीकृष्ण बाळ, संकेत वडके, ज्ञानेश्वर काकडे, अनिकेत कदम, संतोष जाधव, रोहित पवार, परेश सोनावळे, आबा नाईक, कल्पेश रजपुत, ओंकार सावंत, भारत वडके, कुंदेश वनारसे आदी सदस्यांनी मेहनत घेतली.