लॉकडाऊनमुळे मुलगा २ महिने नातेवाईकांकडे अडकला, अखेर झाली आईवडिलांची मुलासोबत भेट

पनवेल : पालघर येथील महेश जोशी यांचा १० वर्षाचा मुलगा त्यांच्या नातेवाईकांकडे सिल्व्हासाला गेला आणि लॉकडाऊन जाहीर झाले. अखेर दोन महिन्यांनी तो आपल्या वडीलांबरोबर सिल्व्हासाहून परत आला. आपल्या मुलाला

पनवेल : पालघर येथील महेश जोशी यांचा १० वर्षाचा मुलगा त्यांच्या नातेवाईकांकडे सिल्व्हासाला गेला आणि लॉकडाऊन जाहीर झाले. अखेर दोन महिन्यांनी तो आपल्या वडीलांबरोबर सिल्व्हासाहून परत आला. आपल्या मुलाला परत आलेले पाहताच त्याच्या आईला अश्रु आवरता आले नाहीत. आपल्या मुलाची भेट घडवून आणणार्‍या पनवेलच्या संदीप रोडे यांचे त्यांनी फोन करून आभार मानले. 

संदीप रोडे यांना काही दिवसापूर्वी पालघरहून महेश जोशी यांचा फोन आला. माझा १०  वर्षाचा मुलगा सिल्व्हासाला  नातेवाईकांकडे गेला आणि लॉकडाऊन झाल्यामुळे अडकला आहे . त्याला आणण्यासाठी टोकन नंबर मिळतो पण दोन वेळा प्रयत्न केले पास देतो म्हणतात पण पास मिळत नाही मला मदत करा.जव्हार येथील नायब तहसीलदार वसंत सांगले यांना संदीप रोडे यांनी विनंती केली आणि महेश जोशी यांना पास मिळाला. त्यांनी फोन करून आभार मानले. नैसर्गिक आपत्ती आली की महसूल कर्मचारी नुकसानीचे पंचनाम्यापासून  मदत वाटण्या र्यंतची  काम करीत असतात. या वाटपात झालेल्या गोंधळाच्या कहाण्या आपण नंतर अनेक दिवस ऐकत असतो पण याला काही अपवाद ही असतात. पनवेलचे मंडळ अधिकारी संदीप रोडे, करंजाडेचे तेलंगे अण्णा , तलाठी राठोड ही त्याची उदाहरण म्हणता येतील. कोणी मदतीची याचना करताच हे लगेच धावून जात असल्याने त्या व्यक्तीला ते देवदूतच वाटतात . या आपत्तीच्या काळात संदीप रोडे यांच्या  वयाचा विचार करून शासनाने त्यांना घरून काम करण्यास परवानगी दिली आहे. पण त्यांना फोन करताच ताबडतोब संबंधितांना कार्यक्षेत्राचा गोंधळ न करता मदत मिळणार याची खात्री बाळगता येते.