लॉकडाऊनच्या काळातही उरणच्या चिर्ले भागात बैलगाडी शर्यतीचे आयोजन

उरण: एकीकडे देशातील नागरिक कोरोनाच्या महामारीच्या संकटात सापडला असताना उरण तालुक्यातील चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील धनदांडगे मात्र शासनाने बंदी घातलेल्या बैलगाडी शर्यतींचे आयोजन करून आपली हौस भागवून

उरण: एकीकडे देशातील नागरिक कोरोनाच्या महामारीच्या संकटात सापडला असताना उरण तालुक्यातील चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील धनदांडगे मात्र शासनाने बंदी घातलेल्या बैलगाडी शर्यतींचे आयोजन करून आपली हौस भागवून घेत आहेत. बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी आणि शर्यतीमध्येभाग घेण्यासाठी नवीमुंबई, पनवेल, उरण परिसरातून नागरीक आणि धनाढ्य मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यामुळे या ठिकाणावरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर त्याला जबाबदार कोण असा सवाल रहिवासी विचारत आहेत.

प्रत्येक गावाला आपली एक परंपरा असते.ती जपण्याचा प्रयत्न ग्रामस्थ आपल्या परिने दरवर्षी करीत असतात. मात्र मार्च २०२० पासून जगाला,देशाला,राज्याला कोरोनाच्या महामारीने ग्रासल्याने देश परदेशातील नागरिक भितीच्या सावटाखाली आपले जीवन जगत आहेत. तसेच शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत  आपल्या ग्रामदैवताच्या जत्रा, उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लग्न समारंभ प्रसंगी होणारी गर्दी टाळण्यासाठी लग्न समारंभ न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे चित्र प्रत्येक जिल्ह्यात, गावोगावी पाहावयास मिळत आहे.आज कोरोनामुळे देशातील जनता आपले जीवन घरात राहून जगत आहे. जीव धोक्यात घालून प्रशासकीय अधिकारी,पोलीस यंत्रणा, डॉक्टर, परिचारिका या देशसेवेसाठी दिवस-रात्र मेहनत करताना दिसत आहेत. मात्र उरण तालुक्यातील चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील बैलगाडी शर्यत आयोजकांनी कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर शासनाच्या नियमांची पायमल्ली करून राजरोसपणे
बैलगाडी शर्यतीचा गौरखधंदा सुरू केल्याचे भयानक चित्र गावठाण येथील शेत परिसरात पाहावयास मिळत आहे.यासंदर्भात येथील रहिवाशांना विचारणा केली
असता त्यांनी सांगितले की या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने पोलीस अधिकाऱ्यानी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यासाठी परवानगी दिली
आहे.त्यामुळे या ठिकाणी दररोज बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे.त्यामुळे रहिवाशांना विरंगुळा ही मिळत आहे. या बाबत उरण पोलीस
ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जगदिश कुलकर्णी यांच्याकडे विचारणा केली असता अशा प्रकारच्या बैलगाडा शर्यतींना न्यायालयाची बंदी आहे मात्र तरीही
कोणी अशा शर्यंतीचे आयोजन करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.