
पुणे (Pune) येथून अलिबाग (Alibag) येथे फिरण्यासाठी निघालेल्या पर्यटकांवर खोपोली (Khopoli) बोरघाटात मोठा बाका प्रसंग आला होता.शिंगरोबाच्या कृपाशीर्वादाने जिवावर बेतण्यासारखा आलेला प्रसंग किरकोळ जखमी होण्यावर बेतल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
खोपोली : पुणे-मुंबई द्रूतगती (Pune-Mumbai Expressway) मार्गावर कार आणि ट्रकचा भीषण (Car and truck crash) अपघात झाल्याची माहिती समोर आली आह. या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळच्या दरम्यान झाला. पुणे येथून अलिबाग (Alibag) येथे फिरण्यासाठी निघालेल्या पर्यटकांवर खोपोली (Khopoli) बोरघाटात मोठा बाका प्रसंग आला होता. शिंग्रोबाच्या कृपाशीर्वादाने जिवावर बेतण्यासारखा आलेला प्रसंग किरकोळ जखमी होण्यावर बेतल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
कसा झाला अपघात ?
पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या भरधाव कारने आपल्या पुढे जात असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा डाव्या बाजूचा भाग कापूर कार ट्रकच्या मागील बाजूकडून आत गेल्याने कारमध्ये बसलेले तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भयंकर होता की, कारच्या अर्ध्या भागाचा पूर्णपणे चेंदा झाला आहे. परंतु नशीब बलवान म्हणून यातील सर्व प्रवासी वाचले आहेत. मात्र, यातील तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तसेच अधिक उपचारासाठी कलंबोली येथील एमजीएम रूग्णालयात लोकमान्य अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून घेऊन जाण्यात आले.

या अपघाताची माहिती बोरघाट पोलिसांना मिळताच, पोलिसांनी यंत्रणेची संपूर्ण टीम, आय आर बी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीच्या टीमने तात्काळ मदत केली. तसेच हा अपघात कसा झाला याबाबतची पुढील चौकशी पोलीस करत आहेत.
खोपोली बोरघाटात बस पलटी
बोरघाट येथे बस गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदरची बस रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याने झालेल्या अपघातात बस मधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. खोपोलीच्या दिशेने उतरताना हा अपघात झाला असून बसमधील सर्व प्रवाशी हे पिंपरी चिंचवड परिसरातले आहेत ते अलिबाग येथे जात होते. या बसमध्ये एकूण १७ जण होते.

अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस यंत्रणेची संपूर्ण टीम, आय आर बी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीच्या टीमने तात्काळ मदत केली. २ मेजर जखमींना एमजीएम रुग्णालय कामोठे येथे लोकमान्य हॉस्पिटलच्या ऍम्ब्युलन्सने हलविण्यात आले आहे.तर यातील सहा ते सात किरकोळ जखमींना खोपोली पालिका रुग्णालयात दखल करून त्यांच्यावर इलाज करून त्यांना सोडण्यात आले.
जर ही बस डावीकडे उलटली असती तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. सुदैवाने हा दुर्दैवी प्रसंग किरकोळ क्षतीने कंट्रोलमध्ये आल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.