सुतारवाडी दशक्रोशितील घरे उद्ध्वस्त ; आदिवासी वाडे जमीनदोस्त

-ग्रामपंचायतीचे पत्रे उडाले, जागोजागी रस्तोरस्ती वृक्ष उन्मळली. सुतारवाडी : चक्रीवादळाच्या धुमशानाने दि. ३ मे रोजी क्षणात सुतारवाडी आणि दशक्रोशिला मोठा तडाखा बसला. त्यामुळे

-ग्रामपंचायतीचे पत्रे उडाले, जागोजागी रस्तोरस्ती वृक्ष उन्मळली. 

सुतारवाडी  : चक्रीवादळाच्या धुमशानाने  दि. ३ मे रोजी  क्षणात सुतारवाडी आणि दशक्रोशिला मोठा तडाखा बसला. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ आजही मोठ्या विवंचनेत आहेत. दुपारी दीडच्या दरम्यान निसर्ग वादळासह पावसाने सुरुवात केली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. ग्रामस्थ आपल्या डोळ्यांनी होणारे नुकसान पाहत होते. मात्र निसर्गापुढे कोणाचेही काही चालले नाही.  दशक्रोशितील घरांवरचे,  इमारतीचे वरचे पत्रे तसेच शेड अक्षरशः जमीनदोस्त झाल्या. वादळी वाऱ्याने उग्र रूप धारण केल्याने अनेक जण निवारा शोधून गप्प बसले होते. अनेकांचा सुरक्षेचा प्रश्‍न उभा राहिला. काहींनी तर गावातील मंदिराचा आश्रय घेतला. घरावरचे पत्रे पत्त्या सारखे उडून गेल्याने अनेक जणांचा राहण्याचा प्रश्‍न उभा राहिला. घरावरचे पत्रे उडाल्याने घरात पाण्याचे तळे निर्माण झाले होते. लाईटचे पोल उन्मळून पडलेले होते. त्यामुळे लाईट गायब झाली होती. लाईट पुन्हा कधी पुर्वरत होईल याचा भरवसा नाही. सुतारवाडी कोलाड मार्गावरील लाईटचे पोल जमिनीला टेकल्यामुळे अतिउच्च दाबाच्या वायर रस्त्यावर पडल्या होत्या. कोलाड रेल्वे फाटकाचे पोल जमीनदोस्त झालेल्या अवस्थेत होते. म्हस्करवाडी एसटी थांब्याजवळ छोटेसे कौलारू दुकान होते ते क्षणात जमीनदोस्त झाले. कोलाड नाक्यावर कोरोना काळात उभारण्यात आलेली पोलीस चौकी तसेच एम.एस.ई.बी पूर्णपणे निसर्गाने निळंगृत केली. सुतारवाडी नाक्यावर ग्रामस्थांना निसर्ग ने अनेकांच्या तोंडचे पाणी पळविले. सुतारवाडी नाक्यावर दोन हार्डवेअरचे दुकान आहेत. तेथे अनेकांनी पत्र्यासाठी मोठी गर्दी केली. लॉक  डाऊन च्या काळात बंद असल्यामुळे मोजक्याच पाच ते सहा जणांना पत्रे मिळाले.

अनेकांनी कोलाड, रोहा,  खांब, नागोठणे,  पेन, पनवेल, पर्यंत पत्रासाठी धाव घेतली. मात्र कोठेही पत्रे मिळाले नाहीत. दुकानदारांनी सांगितले ट्रक केव्हा येतील याचा भरवसा नाही. मोबाईलला रेंज नसल्यामुळे व्यापाऱ्यांकडे संपर्क होत नसल्यामुळे पत्रे केव्हा येतील याचा भरोसा नसल्याचे दुकानदारांनी सांगितले. सुतारवाडी आणि दशक्रोशितील एकही गाव असे राहिले नाही की ज्यांच्या घराचे नुकसान झालेले नाही. ग्रामपंचायतीचे पत्रे सुद्धा चेंडूसारखे इतरत्र उडाले. जागो जागी असलेल्या कमानी जमिनीला टेकल्या. अनेक झाडे रस्त्यावर उन्मळून पडली. मात्र ती झाडे हटविण्यात अनेकांनी सहभाग घेतला त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवला नाही. प्रत्येक जण आपले घर सावरण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. ग्रामीण भागातील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळित झाले आहे. पावसाने सुरुवात केली आता शेतावर जावून शेतीची कामं करायची की घर दुरुस्त करायचे असा मोठा गंभीर प्रश्न ग्रामस्थांना पडलेला आहे. घरावरचे अनेक पत्रे तसेच इतर सामानांचे  अतोनात नुकसान झाल्याने नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सुतारवाडी परिसरातील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील आदिवासी वाड्यांचे ही निसर्ग चक्रीवादळाने मोठे नुकसान केले आहे. कोरोनाशी मुकाबला चालू असताना अचानक निसर्गाने मोठा आर्थिक फटका दिल्याने ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग तसेच सामान्य माणूस मोठ्या विवंचनेत आहे. 

निसर्ग चक्रीवादळा मुळे रोहा तालुक्यासह माणगाव तालुक्यातही सर्वच ए.टी.एम बंद असल्यामुळे त्याच प्रमाने बँकेचे व्यवहार ठप्प झाल्यामुळे नागरिकांची कुचंबणा झाली