म्हसळ्यात चाकरमानी महिलेचा प्रवासात मृत्यू

गेले काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागातील मजुरांचे लोंढे आपापल्या गावाकडे परतणे सुरू झाले आहे. त्याचप्रमाणे मुंबई, ठाणे, पनवेल या परिसरांतून चाकरमानी पायी अथवा मिळेल त्या साधनाने कोकणात आपल्या

गेले काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागातील मजुरांचे लोंढे आपापल्या गावाकडे परतणे सुरू झाले आहे. त्याचप्रमाणे मुंबई, ठाणे, पनवेल या परिसरांतून चाकरमानी पायी अथवा मिळेल त्या साधनाने कोकणात आपल्या मूळ गावकडे येत आहेत. त्यातच शनिवारी पनवेल येथून येणाऱ्या एका कुटुंबातील ६२ वर्षीय महिलेचे प्रवासा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि.१६ रोजी सायंकाळी घडली. पनवेल येथील हॉटस्पॉट परिसरांतील कुटुंबातील ७ प्रवासी आपल्या गावाकडे येत असताना घरापर्यंत पोहचेपर्यंत त्यातील ६२ वर्षीय महिलेचा दुर्देवी अंत झाला. 

सदर महीलेला दमा, उच्च रक्तदाब पहिल्या पासून असल्याचे नातलगांनी सांगताच घटनेचे गांभीर्य ओळखून मृत महिलेचे स्वॅब सँपल तात्काळ शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. महीलेच्या समवेत असणाऱ्या नात्यातील अन्य प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. चाकरमानी महिलेचा मृत्यू झाल्याने अनेकांच्या काळजात धडकी भरली असून कोरोनाचे पार्श्वभूमीवर आणि गावागावात चाकरमा चाकरमान्यांची वाढती गर्दी, होम क्वारंटाइन नियमावली यावर प्रशासनाकडून कडक पावले उचलली जावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.