charge sheet filed against arnab goswami in 2018 suicide case
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी आरोपपत्र दाखल

या आरोपपत्रात कलम ३०६ अन्वये आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या कलमाचा समावेश आहे. अर्णब गोस्वामी यांनी गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करत अलिबाग आत्महत्या प्रकरणी चौकशी थांबविण्यात यावी अशी मागणी केली आहे.

रायगड : रिपब्लिक टीव्हीचे अँकर अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी रायगड पोलिसांनी येथील न्यायालयात आपोरपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात अर्णब गोस्वामीसह फिरोज शेख आणि नितेश सारडा यांनाही आरोपी करण्यात आले आहे. जवळपास १९०० पानांच्या या आरोपपत्रात ६५ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.

या आरोपपत्रात कलम ३०६ अन्वये आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या कलमाचा समावेश आहे. अर्णब गोस्वामी यांनी गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करत अलिबाग आत्महत्या प्रकरणी चौकशी थांबविण्यात यावी अशी मागणी केली आहे.

अर्णब आणि फिरोज शेख आणि नितेश सारडा यांना ४ नोव्हेंबर रोजी अलिबाग येथे राहणारे इंटिरिअर डिझाइनर अन्वय नाईक आणि त्यांची आई यांना २०१८ साली आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अर्णब आणि या दोघांवर अन्वय नाईक यांची थकबाकी अदा न केल्याचा आरोप आहे.