मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तळीये गावात, दुर्घटनाग्रस्त भागाची करणार पाहाणी

रायगडमधील तळीयेच्या दुर्घटनेने सगळा महाराष्ट्र हळहळला. एका क्षणात होत्याचं नव्हतं झाले. एका क्षणात डोंगराच्या ढिगाऱ्याखाली आख्खं गाव गाडले गेले. पुण्यातील माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती या दुर्घटनेतून पाहायला मिळाली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीये गावाला भेट देणार आहेत.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी १२ वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना होतील. त्यानंतर महाड येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचतील. नंतर ते वाहनाने तळीये गावासाठी रवाना होतील. दुपारी १.३० वाजता तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करतील. तळीयेला पोहोचल्यावर ते गावकऱ्यांशी संवाद साधतील. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची विचारपूस करणार आहेत. त्यानंतर प्रशासानाकडून घटनेची माहिती घेतील, त्याचबरोबर ग्रामस्थांशी संवाद साधतील. दुपारी ३.२० वाजता ते परत महाडला येतील. नंतर मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील. असं सूत्रांनी सांगितलं.

    दरम्यान, माळीण दुर्घटनेची आठवण देणारी घटना गुरुवारी रायगड जिल्ह्यात घडली. अतिवृष्टी झाल्याने महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळली. दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली ३५ पैकी ३२ घरं गाडली गेली. कालपासून (२३ जुलै) तळीयेत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे.