खांदा वसाहतीमधील शिवसैनिकांनी केली चिनी वस्तूंची होळी

पनवेल : खांदा वसाहतीमधील शिवसैनिकांनी एकत्र येऊन आज चिनी वस्तूंचा निषेध करीत त्या वस्तू फोडून टाकल्या. तसेच प्रत्येकाने चिनी वस्तूवर बहिष्कार टाकावा व त्याचा वापर करून नये, दुकानदारांनी त्याची

पनवेल : खांदा वसाहतीमधील शिवसैनिकांनी एकत्र येऊन आज चिनी वस्तूंचा निषेध करीत त्या वस्तू फोडून टाकल्या.  तसेच प्रत्येकाने चिनी वस्तूवर बहिष्कार टाकावा व त्याचा वापर करून नये, दुकानदारांनी त्याची विक्री करू नये किंवा चिनी वस्तू विक्रीस ठेवू नये, असे आवाहन शहरप्रमुख सदानंद शिर्के यांनी यावेळी केले आहे.

सध्या भारत व चीन देशाच्या सीमेवर धुमश्चक्री चालू आहे. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. यामुळे संपूर्ण देशात एक असंतोषाची लाट उसळलेली आहे. आपल्या सरकारसह सर्व देशवाशीय चीनी बनावटीच्या वस्तूवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत. चीनला पराभूत करण्यासाठी व त्यांना धडा शिकवण्यासाठी भारतीयांनी चीन बनावटीच्या वस्तूवर बहिष्कार घालणे अत्यावश्यक आहे. सदर वस्तूची विक्री बंद करण्यासाठी खांदा कॉलनीतील दुकानदारांना शिवसेना शहर प्रमुख सदानंद शिर्के यांच्या नेतृत्वाखाली निवेदने देण्यात आली.

यावेळी खांदा कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी चिनी वस्तूची होळी करण्यात आली या प्रसंगी खांदा कॉलनी शिवसेनचे शहर संघटक दत्ता कुलकर्णी ,उपशहरप्रमुख दत्तात्रय महामुलकर उपविभागप्रमुख जयराम खैरे, शाखाप्रमुख सचिन धाडवे, विजय कोलते अरविंद कासारे, राजीव गमरे, योगेश कुरतडकर उपशाखाप्रमुख दिपक जावकर व खांदा काॅलनी महिला शहर संघटिका सानिका मोरे व विनिता कोलते माजी उपविभागप्रमुख संजीव गमरे व संपत सुवर्णा अतुल घुग ,जयवंत भायदे भास्कर साळवी,केशव सुवरे, तोरणे सर ,दिपक चांदिवडे व आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.