MNS Effect work

ईश्वर नगर व सद्गुरू नगर परिसरातील गटार व रस्त्यांचे काँक्रीटीकरणची नागरी कामे मनपा कडून करण्यात आली होती. परंतु ईश्वर नगर येथील तपस्या चाल येथील काँक्रीटचे काम झाले नव्हते.

नवी मुंबई : दिघा येथील ईश्वर नगर व सद्गुरू नगर परिसरातील गटार व चाळी (Drainage Or Chawl Work) मधील रस्त्यांचे काँक्रीटीकरण कामे झाली नव्हती. यामुळे येथील हजारो नागरिकांना याचा मोठा त्रास होत होता. शेवटी मनसेचे दिघा विभाग अध्यक्ष भूषण आगीवले यांनी दिघा विभाग कार्यालयाशी पत्रव्यवहार करून राहिलेली नागरी कामे पूर्णत्वास येत आहेत. यामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केला आहे.

ईश्वर नगर व सद्गुरू नगर परिसरातील गटार व रस्त्यांचे काँक्रीटीकरणची नागरी कामे मनपा कडून करण्यात आली होती. परंतु ईश्वर नगर येथील तपस्या चाल येथील काँक्रीटचे काम झाले नव्हते. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणत त्रास होत होता.तर सद्गुरू नगर मधील गुरू कृपा चाळीतील गटारे खराब झाली होती. यामुळे येथील रहिवासी त्रस्त होते.

याची माहिती दिघा मनसे विभाग अध्यक्ष भूषण आगीवले याना मिळाल्या नंतर त्यांनी दिघा विभाग कार्यालयाशी पत्रव्यवहार केला.त्यानंतर दिघा विभाग कार्यालया कडून नागरी समस्यांची पाहणी करून गटाराचे व चाळीतील रस्त्यांच्या कामाचे काँक्रीटीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे येथील रहिवाश्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

नागरी समस्या सुटाव्यात म्हणून दिघा विभागाशी पत्रव्यवहार करून परिस्थितीची जाणीव मनपा अधिकाऱ्यांना दिली.त्यानंतर त्यांनी कामास सुरुवात केली.त्यामुळे मनपाचे आभारी आहे.

- भूषण आगीवले,मनसे अध्यक्ष,दिघा विभाग