पनवेल महापालिकेचे स्वच्छतेसाठी एक पाऊल पुढे – दुर्गंधीपासून मुक्त होणार

पनवेल : पनवेल महापालिकेने स्वच्छतेसाठी एक पाऊल पुढे टाकले असून पालिका हद्दीतील मलनिस्सारण वाहिन्यांची सफाई करण्यासाठी आधुनिक मशिनरीचा वापर आणि मनुष्यबळ वाढणार असल्याने पनवेलकरांची आता

पनवेल  : पनवेल महापालिकेने स्वच्छतेसाठी एक पाऊल पुढे  टाकले असून पालिका हद्दीतील मलनिस्सारण वाहिन्यांची सफाई करण्यासाठी आधुनिक मशिनरीचा वापर आणि मनुष्यबळ वाढणार असल्याने पनवेलकरांची आता दुर्गंधीपासून मुक्तता होणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी दिली.  पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा आज ४ जून रोजी प्रवीण पाटील यांचे अध्यक्षतेखाली झाली यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे उपस्थित होते. आजच्या सभेत महापालिका हद्दीतील मल:निस्सरण वाहिन्यांतील गाळा काढून त्यांची साफसफाई करण्याच्या आवश्यक मशिनरीसह मनुष्यबळ पुरवण्याच्या निविदेला मंजूरी देण्यात आली. यामुळे आता पनवेलमध्ये मलनिस्सारण वाहिन्या तुंबण्याचे प्रमाण कमी होऊन स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त पनवेल होईल अशी खात्री प्रवीण पाटील यांनी व्यक्त केली. या शिवाय शौचालये  दुरुस्तीला परवानगी देण्यात आली. नाट्यगृहातील कामांना मंजूरी देण्यात आली. फोमिंग मशीन, त्यासाठी लागणारे रसायन खरेदी, कोरोना प्रतिबंधासाठी लागणारे साहित्य, वडाळे तलाव सुशोभीकरणास मंजुरी देण्यात आली. कोरोना रुग्णाची स्वॅब तपासणीसाठी १३ लाख ७१ हजार रुपये खर्चास ही मंजूरी देण्यात आली  

पनवेल महापालिका हद्दीतील १४ एमएलडी क्षमतेच्या मल निस्सारण प्रक्रिया केंद्राची नगरपालिका असताना दिलेल्या कामाची मुदत संपून ही दोन वर्षे नवीन ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली नव्हती त्याबाबत मांडलेल्या प्रस्तावाला सभागृह नेते परेश ठाकूर यांनी विरोध करून आज पर्यंत प्रशासनाने निविदा का काढली नव्हती. त्याला जवाबदार कोण याची माहिती देऊन या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची  मागणी करून हा प्रस्ताव  स्थगित ठेवण्याची मागणी केली. त्याला सर्व सदस्यांनी पाठिंबा दिल्याने स्थगित ठेवण्यात आला. याशिवाय भूखंड क्रमांक ५०८ व ५२० खाडीच्या बाजूने रिटर्निंग वॉल  बांधण्याच्या वाढीव खर्चास मान्यता देण्यात आली नाही. सभागृह नेते परेश ठाकुर यांनी निसर्ग वादळामुळे जीवित आणि वित्त हानी किती झाली याबद्दल माहिती घेऊन पावसाळा येत असल्याने महापालिकेची व्यवस्था योग्य प्रकारे सुसज्ज करण्याची मागणी केली.