konkan wildlife

सर्वनाशाला चुकीचे विकास कृतीआराखडे , बड्या उद्योग समूहाची हाव आणि तुम्ही आम्ही प्रत्येक जण कारणीभूत आहोत. कचरा व्यवस्थापन , वृक्ष तोड या सामान्य वाटणाऱ्या समस्यांची विषमता आणि कार्ब उत्सर्जनाचे वाढते गंभीर परिमाण आजही अनेकांना लक्षात येत नाहीत. विशेष म्हणजे पूरपरिस्थिती, अनिर्बंधित रोगाची करणे , साथीचे रोग आणि प्रचंड मोठ शैक्षणीक नुकसान या सर्वांमध्ये आपण सर्वजण भरडले जात आहोत.

महाड : शनिवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी झालेल्या विजघात आणि पाऊस यामुळे महाड परिसरातील बगळे, करकोचे, वंचक , पाणकावळे आदी पाणथळ पक्षांच्या घरट्यातून पिल्ले खाली पडली. (Climate change adversely affects wildlife,) सिस्केप महाड संस्थेच्या सदस्यांनी स्थानिकांच्या मदतीने पिलांना वाचविले. त्यांना दोन दिवस खाद्य पुरविले. उपासमार व इतर उपद्रवी प्राण्यांपासून सुरक्षित ठिकाणी त्यांचे संगोपन केले.

काल दिनांक १२ ऑक्टोबर रोजी त्यांना चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबडकर सभागृह येथील बागेत पून्हा निसर्गात सोडण्यात आले. तर काही पिल्लांची शुश्रुषा अजुन सुरू आहे. पावसात बेघर झालेल्या १६ मुग्ध बलाक ( करकोचे कुटुंब ) या प्रजातींची मोठी पिल्ले महाड वनविभाग चे पी डी जाधव व कर्मचारी वृंद , पत्रकार श्रीकृष्ण बाळ, महाड नगर परिषद धनंजय देशमुख व कर्मचारी वृंद , यांच्या उपस्थितीत सुखरूप सोडण्यात आले.

आपल्या सर्वांचे आरोग्य , सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम आणि नवीन पिढीचे भयावह भविष्य या सर्व घटनांचा मागोवा घेताना मानवी प्रगतीची वाटचाल घटक परिस्थितीकी बदल निर्माण करण्याकडे कमालीची पुढे गेली आहेत हे स्पष्ट होते. कोवळ्या संवेदनशील छोटया मुलांना हवामान बदलाचा जो वास्तव परिणाम जाणवतो आहे त्याची थोडी देखील आच आपल्याला एक जबाबदार नागरिक लोकप्रतिनिधी म्हणून वाटत नाही का ? हा सवाल या निमित्ताने पर्यावरण प्रेमिंकडून केला जातोय.

या सर्वनाशाला चुकीचे विकास कृतीआराखडे , बड्या उद्योग समूहाची हाव आणि तुम्ही आम्ही प्रत्येक जण कारणीभूत आहोत. कचरा व्यवस्थापन , वृक्ष तोड या सामान्य वाटणाऱ्या समस्यांची विषमता आणि कार्ब उत्सर्जनाचे वाढते गंभीर परिमाण आजही अनेकांना लक्षात येत नाहीत. विशेष म्हणजे पूरपरिस्थिती, अनिर्बंधित रोगाची करणे , साथीचे रोग आणि प्रचंड मोठ शैक्षणीक नुकसान या सर्वांमध्ये आपण सर्वजण भरडले जात आहोत. पण त्याचा पर्यावरणातील पक्षी प्राणी वनस्पती आदींवर होणारा गंभीर परिमाण खूपच निराशाजनक आहे. हे सत्य सर्वाधिक असुरक्षित आहे. प्रमाणा बाहेर वाढलेल्या कर्ब हरित वायू प्रदूषण , पाण्यातील प्रदूषण आणि जमिनीवरील कॉंक्रीटीकरण याचा परिणाम थेट तापमान बदलावर झाला. परवाचे रायगड जिल्ह्यातील वादळ , विजेचे तांडव आणि वारा पाऊस हे याचेच उदाहरण आहे .

चवदार तळे येथील बलाक-बगळ्यांच्या पिल्लानी आजूबाजूच्या परिसरात घरांच्या छापरांवर आधार घेत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी सिस्केप सदस्य ओंकार सावंत, मिहिर शिरगावकर,प्रतीक देसाई, चिराग बाईत , सोहम धारप, योगेश जोशी , काव्या जोशी , सारा राऊत, वेदांग, चिराग , योगेश गुरव, सिध्दांत भागवत, निमिष गांधी श्रध्दा जोशी आणि समृद्धी भुतकर यांना संपर्क साधला. या वेळी दस्तुरी नाका, सुकाळे मेडिकल, क्रांती स्तंभ, चवदार तळे, भाजी मंडई, सुकट गल्ली , गांधी टॉकीज, राम मंदिर आदी ठिकाणांहून २३ पक्षांना सुखरूप पकडण्यात आले. तर काही मृत पक्षांची नोंद घेण्यात आली.

यामध्ये भुरा वंचक ( इंडियन पौंड हेरोन ) प्रजातींची ६ पिल्ले, रात्रिंचर वंचक प्रजातींची २४ पिल्ले , मोठा बगळा ( ग्रेट इग्रेट ) प्रजाची दोन पिल्ले, मुग्ध बलाक ( ओपन बिल स्टार्क ) प्रजातीचे एक पिल्लू इत्यादींचा समावेश होता. सावित्री खाडी आणि किनाऱ्याच्या खाजण व पाणथळ जागामुळे पाणथळ पक्षी घरटी करण्यासाठी जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने येत असत. परंतु गेल्या दोन दशकात पासून बदलत्या हवामन आणि वाढत्या तामानामुळे या प्रजातींच्या घरटयांवर कमालीची घट दिसून येते. त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे.

पक्षिगण हे खरतर वातावरणीय बदलाचे दर्शक आहेत. त्यांच्या आगमनावरून हवामान बदलाचा परिणाम थेट लक्षात येतो. यामध्ये सर्वश्रुत चातक पक्षी, पावशा पक्षी पावसाची पूर्वसूचना देण्यासाठी भारतात स्थलांतर करतात हे शेतकऱ्यांना माहीत आहे. अवकाळी पावसाने आणि विजेच्या तडाख्याने हवामान- तापमान बदलाचे गंभीर परिमाण वन्यजीवां वर होत आहेत . पावसाने शेतीचे नुकसान तर केले आहेच परंतु जनजीवन विस्कळित होणे तसेच विविध विषाणूंची निर्मिती हे आव्हानात्मक नव्या अडचणी निर्माण करणारे आहे.