“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार

दुपारी सव्वा दोनच्या सुमारास मुख्यमंत्री तळीये गावात पोहोचले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी त्यांच्यासोबत होते. मुख्यमंत्री भरपावसात चिखलातून वाट काढत घटनास्थळी पोहोचले.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाडच्या तळीये गावात जाऊन दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेत दगावलेल्या लोकांच्या नातेवाईकांची विचारपूस करून त्यांचं सांत्वन केलं. त्यावेळी मृताच्या नातेवाईकांशी बोतना “तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. या दुर्घटनेत ज्यांचं नुकसान झालं आहे. त्यांचं सर्वांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यांची सर्व कागदपत्रे त्यांना मिळवून देण्यात येणार आहे. तुम्ही काळजी करू नका. सर्वांना मदत दिली जाईल” असं मुख्यमंत्री म्हणाले.

    दुपारी सव्वा दोनच्या सुमारास मुख्यमंत्री तळीये गावात पोहोचले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी त्यांच्यासोबत होते. मुख्यमंत्री भरपावसात चिखलातून वाट काढत घटनास्थळी पोहोचले.

    मुख्यमंत्री घटनास्थळी येताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना घटनेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांचं सांत्वन करत त्यांना धीर दिला. दुर्घटनाग्रस्त तळीयेची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला.