पडलेल्या झाडांचे आणि बंद रस्त्यांचे फोटो अन् व्हिडिओ पाठविण्याचे रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषत: अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्तेही बंद झाले आहेत. जिल्हाधिकारी निधी

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषत: अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्तेही बंद झाले आहेत. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी झाडे पडून जेथील रस्ते बंद झाले आहेत, याची माहिती प्रशासनाला तातडीने मिळावी यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. नागरिकांनी पडलेल्या झाडांचे व त्यामुळे बंद झालेल्या रस्त्यांचे फोटो व व्हिडिओ ८२७५१५२३६३ या व्हॉटस अॅप क्रमांकावर पाठवावेत. तसेच १०७७ या टोल फ्री क्रमांकावर आणि ०२१४१- २२२११८ या दूरध्वनी क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

नागरिकांनी वरील व्हॉटस्अप क्रमांकावर पडलेल्या झाडांचे व त्यामुळे बंद झालेल्या रस्त्यांचे फोटो व व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर व १०७७ या टोल फ्री क्रमांकावर आणि ०२१४१- २२२११८ या दूरध्वनी क्रमांकावर आपली तक्रार नोंदविल्यानंतर प्रशासनातील संबंधित यंत्रणेला नागरिकाने नोंदविलेली ती तक्रार तात्काळ कळविण्यात येईल व झाड पडल्यामुळे बंद झालेला संबंधित रस्ता लवकरात लवकर मोकळा करण्यात येईल. तरी रायगडकरांनी पडलेल्या झाडांचे व त्यामुळे बंद झालेल्या रस्त्यांचे फोटो व व्हीडिओ ८२७५१५२३६३ या व्हॉटस्अप क्रमांकावर पाठवावेत. तसेच १०७७ या टोल फ्री क्रमांकावर आणि ०२१४१- २२२११८ या दूरध्वनी क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.