कोरोनाविषयक विविध बाबींचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी म्हसळा तालुक्यात दिली भेट

म्हसळा :म्हसळा तालुक्यात रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कोरोना विषयक बाबींचा आढावा घेण्याच्या उद्देशाने विशेष भेट दिली. त्यावेळी आरोग्य विभाग( राज्य ), आरोग्य विभाग ( जिल्हा परिषद),

 म्हसळा : म्हसळा तालुक्यात रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कोरोना विषयक बाबींचा आढावा घेण्याच्या उद्देशाने विशेष भेट दिली. त्यावेळी आरोग्य विभाग( राज्य ), आरोग्य विभाग ( जिल्हा परिषद), महसूल, पोलीस, नगर पंचायत, पंचायत समिती, ग्रामविकास, बांधकाम, शिक्षण, महसुल-वन या सर्वच खात्यांविषयी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आढावा व समन्वय यासाठी खबरदारीची उपाययोजना याबाबत चर्चा व मार्गदर्शन केले. या सोबतच स्थानिक पत्रकारांजवळ सुद्धा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी संवाद साधला, यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचे काेरोना युध्दात जिल्हा प्रशासनाला सहकार्य असते त्यामुळे तुमच्यासह जिल्ह्यांतीत सर्वांचेच धन्यवाद असे म्हणून कौतुक केले व दिलखुलास चर्चा केली. यावेळी उपस्थित पत्रकारांनी कोरोनावर मात करण्यासाठी म्हसळाकरांनी काेरोनाच्या लढयात सर्व जिल्हा प्रशासना समवेत असणार असे ठाम सांगितले. यावेळी श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, तहसीलदार शरद गोसावी, श्रीवर्धन, जसवली व म्हसळ्याचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.मधुकर ढवळे, वैद्यकिय अधिकारी डॉ.महेश मेहता, टी.एच.ओ. डॉ.गणेश कांबळे, गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे, सपोनी धनंजय पोरे, सां.बा.उप अभीयंता श्रीकांत गणगणे, वन विभागाचे नरेश पाटील, सीडीपीओ व्यंकट तरवडे, गटशिक्षणाधिकारी संतोष शेडगे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कोरोनाच्या बाबतीत म्हसळा तालुक्याचा आढावा घेतला असता तालुक्यात मृत्यू दरात वाढ असणे हे विचार करण्याजोगे आहे असे सांगतानाच आपण सर्वानी कोरोना बाबत एकत्रित काम करताना भविष्यात म्हसळ्यात कोरोना मुळे एकही मृत्यू होणार नाही याची दक्षता घेऊया, असे सांगितले. तालुक्यात वारळ व दुर्गवाडी येथील मृत झालेले २ रुग्ण व कोरोना पॉझिटिव्ह असलेले गायरोणे, पाभरे, कणघर, ठाकरोली, तळवडे या गावातील रुग्णांबाबत चौकशी केली. जिल्ह्यांत आवश्यकता वाटल्यास आपण ५००० खाटांचे रुग्णांची व्यवस्था करू, म्हसळ्यात आय.टी.आय. मध्ये ३५ खाटांची व्यवस्था आज असली तरी भविष्यांत ५० खाटांचे कोव्हीड केअर सेंटरची तयारी करणार असल्याचे सांगितले.

प्रेस क्लबच्या माध्यमांतून तालुक्यात इन्सीडेंट कमांडरने सर्वच खात्यााची योग्य माहिती पारदर्शक द्यावी, म्हसळा ग्रामीण रुग्णालयाचा अतिरीक्त कार्यभार तात्काळ स्वतंत्ररीत्या देण्यात यावा, म्हसळा ग्रामीण रुग्णालयासाठी स्वच्छक, कोव्हीड रुग्णांच्या सोयी सुविधा, योग्य जेवण, अॅम्ब्युलन्स अशा अत्यावश्यक सोयी सुविधा मिळाव्यात अशा मागण्या केल्या. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यानी मृत व्यक्ती बाबत समज गैरसमज करण्यापेक्षा कोव्हीड रुग्णांबाबत वॉरीयर यांच्या माध्यमातून योग्य समुपदेशनाची आवश्यकता असल्याचे सांगितले. एनजीओची मदत घ्यावी,असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच यावेळी म्हसळा ग्रामीण रुग्णालय, आय.टी.आय.आगरवाडा येथील कोव्हिड केअर सेंटरची पाहणी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केली.