कामोठे मधील सर्व क्षेत्र पुन्हा खुले करण्याचा आयुक्तांचा आदेश

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कामोठे उपनगरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने आयुक्त गणेश देशमुख यांनी ८ मे पासून संपूर्ण कामोठे कंटेन्मेंट झोन

 पनवेल  :  पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कामोठे उपनगरात कोरोना पॉझिटिव्ह  रुग्णांची संख्या वाढल्याने आयुक्त गणेश देशमुख यांनी ८ मे पासून  संपूर्ण कामोठे  कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले होते. नवीन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी २६ मेच्या रात्री पासून कामोठे मधील सर्व क्षेत्र पुन्हा खुले करण्याचा आदेश दिला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठेचे क्षेत्रफळ २.७६ चौ.किमी आहे. लोकसंख्या १.१३ लाख आहे.  कोरोंनाचे  ४० टक्के रूग्ण एकट्या कामोठ्यातील असल्याने  कामोठे बाहेर संसर्ग फैलावू नये यासाठी सदरचा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून  ८ मे पासून तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांनी  जाहीर केला होता. 

यापूर्वी त्या त्या भागातील इमारती कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर  करण्यात येत असत परंतु कामोठे हा संपूर्ण भागच संवेदनशील झाल्याने हा निर्णय घेण्यात येऊन  सदर भागात बाहेरील लोकांना व येथील लोकांना बाहेर जाण्यास मज्जाव केला होता. अपवाद फक्त शासकीय व अत्यावश्यक सेवा व पोलीस इ. कामे करणारे नोंद करून जाऊ शकत होते.           

 नवीन महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी तेथील नागरिकांना  जाणे – येणे करण्यास आणि जीवनावश्यक सुविधा पुरवण्यास अडचण येत असल्याने कामोठे मधील सर्व क्षेत्र पुन्हा खुले करण्याचा आदेश दिले. भविष्यात या क्षेत्रात कोरोंनाचा रुग्ण सापडल्यास सदर इमारत  कंटेन्मेंट म्हणून गणण्यात येईल . नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि लॉक डाऊन संपे पर्यंत घरात बसणे बंधनकारक असणार आहे.