पनवेलमध्ये ‘मोदी भोजन’ कम्युनिटी किचन सुरु

पनवेल: पनवेल महापालिका क्षेत्रात 'मोदी भोजन' कम्युनिटी किचन आजपासून सुरू करण्यात आली आहेत. कोरोना व्हायरस आणि त्यामुळे असलेल्या लॉकडाऊन परिस्थितीत गरीब नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये

 पनवेल: पनवेल महापालिका क्षेत्रात ‘मोदी भोजन’ कम्युनिटी किचन आजपासून सुरू करण्यात आली आहेत.  कोरोना व्हायरस आणि त्यामुळे असलेल्या लॉकडाऊन परिस्थितीत गरीब नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि भाजपच्यावतीने खारघर, कामोठे, पनवेल या ठिकाणी ही मोफत अन्नछत्र सुरू करण्यात आली आहेत.  पनवेल शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील मुनोथ इम्प्रेस सोसायटीजवळ ‘मोदी भोजन’ कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दररोज दुपारी १२ ते दुपारी १ वाजेपर्यत ३०० गरीब गरजू नागरिकांना मोफत जेवण दिले जात आहे. लॉककडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम चालूच राहणार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मागर्गदर्शनाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविला जात असून खारघर, कामोठे, पनवेल या ठिकाणी  ही कम्युनिटी किचन सुरू करण्यात आली आहेत   आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, चंद्रकांत मंजुळे, पवन सोनी, राहुल वाहुळकर यांच्या हस्ते आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून शनिवारी बेघर, मोलमजुरी, गरजूंना जेवणाचे वाटप करण्यात आले.