मुंबईत अडकलेल्या कोकणवासीयांसाठी विशेष रेल्वे सोडा – काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष माणिक जगताप यांची मागणी

अलिबाग: कोरोनाच्या पार्शवभुमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईत तसेच राज्यातील इतर भागांमध्ये अडकून पडलेल्या चाकरमान्यांना कोकणातील त्यांच्या मूळ गावात येण्याची महाराष्ट्र शासनाने परवागी द्यावी , अशी

अलिबाग: कोरोनाच्या पार्शवभुमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईत तसेच राज्यातील इतर भागांमध्ये अडकून पडलेल्या चाकरमान्यांना कोकणातील त्यांच्या मूळ गावात येण्याची महाराष्ट्र शासनाने परवागी द्यावी , अशी मागणी माजी आमदार,काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. माणिकराव जागताप यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागणीचे निवदन सादर केले. रायगड जिल्ह्यात पेण व महाड येथे कोविड रूग्णालय सुरू कारावे, अशी मागणीदेखील माणिक जगताप यांनी या निवेदनाव्दारे केली आहे. माजी आमदार म्हणून मिळणारे दोन महिन्यांचे एक लाख रूपये निवृत्तीवेतन  माणिकराव जगताप यांनी जिल्हा आपत्ती निवारण निधीसाठी दिले. त्याचा धनादेश त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्द केला. टाळेबंदीमुळे राज्यात अडकून पडलेल्य परराज्यातील मजूरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. राज्य शासन त्यांच्यासाठी एसटीबर उपलबध्द करून देत आहेत.  राज्यातील नागरीकांना देखील त्यांच्या गावी जाण्यासाठी एसटी , रेल्वे आणि खाजगी वाहनांनी प्रवास करण्याची  अधिकृत परवानगी द्यावी असे माणिकराव जागताप यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. ही मंडळी गावात क्वारेंटाईन होण्यास तयार आहेत. तसेच  एस. टी. बसचे प्रवास भाडे देण्यास तयार आहेत. जे लोक प्रवास भाडे देऊ शकत नाहीत त्यांचे प्रवास भाडे स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, राजकीय पुढारी घेतील, असे जागताप यांनी सांगितले.