गणेशोत्सवावर कोरोना व अतिवृष्टीचे सावट, यावर्षी गणेशमुर्ती मध्ये नाही कोणतीही क्रेझ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली तीन साडेतीन महिने असणारे लॉकडाऊन त्यानंतर सार्वजनिक वाहतुक व्यवस्था बंद असल्याने गावांमध्ये अडकून पडलेले नोकरदार यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले असून अनेक व्यवसाय बंद पडले आहेत. सर्वत्र मंदीचे सावट पहायला मिळत आहे. कोकणात दर वर्षी मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरुपात साजऱ्या केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवावर यावर्षी कोरोनाचे सावट आहे ज्यांच्या जीवावर कोकणात हा उत्सव साजरा केला जात असतो तो चाकरमनी आजच्या घडीला विविध समस्यांच्या कात्रीत सापडला आहे.

महाड : गेल्या चार साडे चार महिन्यापासून संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेणाऱ्या कोरोना महामारीचे संकट अद्याप कायम असून कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे अशा परिस्थितीत आलेल्या गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट घोंघावतच आहे त्याच बरोबर पावसाची संतत धार सुरु असून नद्या नाले तुडुंब भरलेले असल्याने अतिवृष्टीचा सामना देखील गणेश भक्तांना करावा लागत आहे. दरवर्षी लोकप्रिय ठरलेल्या चित्रपट अथवा टिव्ही वरील मालिकांमध्ये हिरो अथवा पौराणिक कथेतील महापुरुषांच्या प्रतिमा गणेश मुर्ती मध्ये साकारल्या जात असतात यावर्षी मात्र अशा प्रकारची कोणतीही क्रेझ गणेश मुर्तीमध्ये पहायला मिळत नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली तीन साडेतीन महिने असणारे लॉकडाऊन त्यानंतर सार्वजनिक वाहतुक व्यवस्था बंद असल्याने गावांमध्ये अडकून पडलेले नोकरदार यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले असून अनेक व्यवसाय बंद पडले आहेत. सर्वत्र मंदीचे सावट पहायला मिळत आहे. कोकणात दर वर्षी मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरुपात साजऱ्या केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवावर यावर्षी कोरोनाचे सावट आहे ज्यांच्या जीवावर कोकणात हा उत्सव साजरा केला जात असतो तो चाकरमनी आजच्या घडीला विविध समस्यांच्या कात्रीत सापडला आहे.

त्याच बरोबर शासनाच्या जाचक अटीमुळे काहीना गावी येणे शक्य नाही त्यामुळे अत्यंत साधेपणाने गतवर्षी असणाऱ्या आरासी च्या सामानांचा वापर करीत गणेश भक्त आपला आनंद साजरा करीत आहे. पावसाचा जोर अद्याप कायम असून बाजारातील सामानाचे भाव प्रचंड वाढले असल्याने आधीच चणचण असणाऱ्या गणेश भक्तांचा बजेट कोलमडला आहे.

दरवर्षी लोकप्रिय ठरणाऱ्या चित्रपट व टिव्ही मालिका मधील नायकांची क्रेझ गणेशमुर्ती मध्ये साकारली जात असे यामध्ये बाहुबली खंडोबारायाच्या रुपांमध्ये गेली दोन तीन वर्षे गणेश मुर्तीना मागणी असायची यावर्षी मात्र अशी कोणतीच क्रेझ दिसत नसून पारंपारिक नटरंग टिटवाळा दगडूशेठ हलवाई लालबाग चा राजा लंबोदर अशा गणेश मुर्त्या पहायला मिळत आहेत.