तळा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव – तळेगावमध्ये आढळला १ रुग्ण, धारावीतून आला गावी

तळा: रायगड जिल्ह्यातील तळा शहरापासून ७ किमी.अंतरावर असलेल्या तळेगावातील एका २० वर्षीय युवकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हा युवक मुंबईतील धारावी (कंटेंटमेंट झोन) येथुन ७ मे रोजी गावी आला

तळा: रायगड जिल्ह्यातील तळा शहरापासून ७ किमी.अंतरावर असलेल्या तळेगावातील एका २० वर्षीय युवकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हा युवक मुंबईतील धारावी (कंटेंटमेंट झोन) येथुन ७ मे रोजी गावी आला होता. त्याला ताप येत असल्यामुळे ८ मे ला त्याला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज या युवकाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याला आरोग्य विभागाकडुन पुढील उपचारासाठी हलविण्यात आले असल्याचे समजते.त्याच्यासोबत असलेली त्याची आई आणि भाऊ यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांचा कोरोना अहवाल येणे बाकी आहे. या तिघांना मुंबईहुन गावी घेऊन येणाऱ्या ड्रायव्हरला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. जागतिक आपत्ती कोरोना संसर्ग टाळण्यासाठी राज्य व केंद्र शासन महत्वाची जबाबदारी पेलत असताना लोकांच्या मागणीप्रमाणे झोन प्रमाणे लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यामुळे मुंबई -पुणे सारख्या शहरातील चाकरमानी यांचा मुळ गावाकडे परतण्याचा ओघ वाढला आहे. खाजगी वाहनाने ,शासकीय परवानगीने तर काही चाकरमानी पायी चालत गावाकडे परतत आहेत. मात्र दक्षतेची भुमिका न घेतल्यास कन्टेनमेंट झोनमधुन आलेल्या नागरिकांमुळे कोरोना संसर्ग ग्रामीण भागात झपाट्याने पसरण्यास वेळ लागणार नाही, असे जाणकार नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच कन्टेनमेंट झोनमधुन नागरिक गावी परततातच कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.