सुधागडात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…

पाली : सुधागड पाली येथे शनिवारी एका तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती पाली सुधागडचे तहसीलदार दिलीप रायन्नावर यांच्याकडून घेण्यात आली. पालीतील तरुणाच्या आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह

पाली : सुधागड पाली येथे शनिवारी एका तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती पाली सुधागडचे तहसीलदार दिलीप रायन्नावर यांच्याकडून घेण्यात आली.  पालीतील तरुणाच्या आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह अहवालामुळे पालीकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पाली हे सुधागडचे मुख्य ठिकाण आहे अद्याप तरी याठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नव्ह्ता परंतु आता पालीत कोरोनाने शिरकाव केल्याने पालीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदरच्या आढळून आलेल्या कोरोना रुग्णास पाली कोव्हिड विळीगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून पुढील उपचारासाठी उद्या पुढे पाठवण्यात येणार आहे.  त्याच्या कुटुंबातील  व संबंधित व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे.त्यामुळे खबरदारी म्हणून २८ जून ते १ जुलै चार दिवस पाली बंद ठेवण्याचा निर्णय पाली बाजारपेठ असोसिएशनने घेतला आहे.       

एकंदरीत पाहिलं तर सुधागड तालुक्यात कोरोनाचा शिरकाव मे महिन्यातच झाला होता दि.२४ मे महिन्यात मुंबई गोरेगाव येथून ६२ वर्षीय व्यक्ती नागशेत येथे आपल्या गावी आला होता व त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.त्यानंतर २ जून रोजी एका गोमाशी येथील २४ वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता मात्र उपचारानंतर दोघेही सुखरूप घरी परतले होते. दरम्यान सुधागड तालुका हा काही दिवस कोरोणाच्या वाढत्या संक्रमानापासून  निःचिंत होता, परंतु शनिवारी पालीमध्ये कोरोना रुग्ण  सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.