hospital attack

या घटनेची माहिती पोलिसांना समजताच ते घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. या प्रकरणात ४ जणांन ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. नातेवाईकांनी शस्त्र घेऊन हल्ला केला असल्याची माहिती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिली.

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयातील मयत झालेल्या रुग्णाच्या आठ ते दहा नातेवाईकांनी आरोग्य कर्मचाऱयांना व अधिकाऱ्यांना मारहाण करत रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली. यामध्ये व्हेंटिलेटर, डायलिसिस आदी यंत्राची तोडफोड करण्यात आली आहे. तोडफोड व मारहाण करणाऱ्या चौघा जणांना वाशी पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती वाशी पोलिसांनी दिली. दरम्यान,या आशा प्रकारच्या हल्ल्यामुळे करार पद्धतीवर कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी धास्तावले असून नोकरी सोडण्याच्या इराद्यावर पोहचले आहेत.

वाशी येथील मनपाच्या रुग्णालायत ४८ वर्षीय व्यंकट सूर्यवंशी हे विविध आजारांने पछाडलेल्या रुग्णाला मंगळवारी दुपारी आपत्ती व्यवस्थापन कक्षात दाखल करण्यात आले होते. मनपा रुग्णालयात दाखल करण्याआधी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तिथेही तो रुग्ण गंभीर अवस्थेत होता. त्या रुग्णाला क्षय रोग,एड्स व कावीळ सारखे असल्याने व त्याची परिस्थिती  गंभीर असल्याची माहिती आधीच उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना दिली होती.त्यानंतर त्या रुग्णाला दाखल करून घेतले होते. परंतु मंगळवारी रात्री उपचार सुरू असतानाच साडे तीनच्या सुमारास रुग्ण व्यंकट यांची प्राणज्योत मालवली.

त्यानंतर रुग्णाच्या आठ ते दहा नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यावेळी त्या नातेवाईकांनी क्षणाचाही विलंब न करता प्रथम अपघात वैद्यकीय अधिकाऱ्या बरोबर हुज्जत घालून मारहाण केली. आपत्ती व्यवस्थापन वॉर्ड मध्ये घुसल्यानंतर महिलांना पुढे करून सुरक्षा रक्षक,परिचारिका,कर्मचारी याना त्यांनी मारहाण केली. तसेच व्हेंटिलेटर,कोव्हिडं रुग्णांसाठी असलेला डायलिसिस यंत्रणा यांची नासधूस केली. वॉर्ड मधील असणारी कागदपत्रे फेकून दिली. गॅस सिलेंडर फेकून दिले. दरवाजाची काचा फोडण्यात अली. हे सर्व करत असताना त्यांच्याकडे चाकू,सुऱ्या,कट्टा सारखी हत्यारे त्यांच्याकडे होती असे प्रत्यक्षदर्शी असणाऱ्यांचे म्हणणे आहे.

मयत रुग्ण व्यंकट सूर्यवंशी यांचा मृतदेह शव गृहात नेट असलेल्या नरेश भडके यांनाही दंगेखोरांनी मारहाण केली.यामुळे सर्वच कर्कचारी धास्तवले आहेत. तसेच नव्याने कार्यावर आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जर या रुग्णालयात सुरक्षा नसेल तर येथे  सेवा देण्यास येईल कोण?असा प्रति सवाल व्यक्त केला आहे.तसेच वरिष्ठ अधिकारी पाठिंबा देत नसेल तर आम्हाला काम करावे की नाही असाही प्रश्न विचारला आहे. आधीच नवी मुंबई मनपा आरोग्य सेवेत येण्यास डॉक्टर अनुत्सुक असताना आशा घटनांमुळे मनपा आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होणार आहे.

पोलीस चौकी स्थापन करा

या रुगनालयात नेहमीच वादाचे प्रसंग निर्माण होतात.त्यावेळी पोलीस उपस्थित नसल्याने अनेक अडचणींना कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.म्हणून याठिकाणी पोलीस चौकी स्थापन करावी अशी मागणी आधार फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर शिंदे यांनी केली आहे.

कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

तोडफोड व कर्मचाऱयांना मारहाणीची घटना घडल्या नंतर बुधवरी सकाळी सर्व कर्मचारी एकत्र येऊन काम बंद केले. त्यावेळी झालेल्या दुर्दैवी घटनेचा निषेध केला. तसेच गुन्हेगारांवर कडक कारवाई, पोलीस चौकी व कर्मचाऱ्यांची सुरक्षा करावी अशी मागणी केली.यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे अध्यक्ष कमलेश आठवले यांनी दिला.