म्हसळ्यात २५ दिवसानंतर पुन्हा सापडला कोरोना रुग्ण

म्हसळा : म्हसळा तालुक्यातील आंबेत खाडीपट्ट्यात अद्याप कोरोनाचा कोणताच प्रादुर्भाव किंवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नव्हता परंतु रविवारी लिपणीवावे ग्रुपग्रामपंचायत हद्दीत मुंबईवरून आलेल्या एका

म्हसळा : म्हसळा तालुक्यातील आंबेत खाडीपट्ट्यात अद्याप कोरोनाचा कोणताच प्रादुर्भाव किंवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नव्हता परंतु रविवारी लिपणीवावे ग्रुपग्रामपंचायत हद्दीत मुंबईवरून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर येताच खाडीपट्टा विभागात घबराट निर्माण झाली असून म्हसळ्यात २५ दिवसानंतर पुन्हा कोरोनाचा रुग्ण सापडला आहे.

ही व्यक्ती ही संशयास्पद आजारी आढळल्याने घरातील नातेवाईकांनी या व्यक्तीला उपचार दरम्यान गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले असता तिथे ही ३४ वर्षीय व्यक्ती ही मुंबईतील भेंडी बाजार परिसरातून लिपणीवावेपर्यंत असा प्रवास करून आल्याचे अधिक तपासात निष्पन्न झाले आहे.  त्यामुळे मुंबईतील हॉटस्पॉट असलेल्या भागातून आलेल्या व्यक्तीला गेल्या ५ दिवसांपासून कोरोनाची लक्षणे दिसून आली होती. त्यानंतर कुटुंबाने तात्काळ या व्यक्तीला उपचारासाठी गोरेगाव येथे हलविल्यानंतर ही बाब डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर तात्काळ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश कांबळे, आरोग्य सेवक मंगेश चव्हाण आणि इतर आरोग्य विभाग टीमने घटनास्थळी तात्काळ भेट देऊन सूचना दिल्या. हा रुग्ण माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश कांबळे यांनी सांगितले आहे.

 म्हसळा तालुक्यात २५ दिवसांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने तालुक्याची रुग्ण संख्या ३३ झाली असून यापैकी तिघांचा मृत्यू झला असून उर्वरित ३० जण उपचार घेऊन घरी परतले आहेत, अशी माहिती डॉ.गणेश कांबळे यांनी दिली.
 
 म्हसळा तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ३३ झाली असली तरी कोरोना विषाणूंची फारशी भीती नागरिकांमध्ये राहिली नसल्याचे शहरातील बाजारपेठेमधील वाढत्या गर्दीवरून दिसून येते. तसेच वाढती गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास स्थानिक नगरपंचायत प्रशासन, तहसीलदार महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि पंचायत समिती प्रशासन अपयशी ठरत असल्याची वस्तुस्थिती निर्माण झाली आहे.