पोलादपूरमध्ये कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण

पोलादपूर – पोलादपूर शहरात ६३ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ही महिला पोलादपुरमधील प्रभात नगर येथे राहात असून तिची वैयक्तिक ट्राव्हल हिस्टरी नसून ती गेले सहा महिने

पोलादपूर – पोलादपूर शहरात ६३ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ही महिला पोलादपुरमधील प्रभात नगर येथे राहात असून तिची वैयक्तिक ट्राव्हल हिस्टरी नसून ती गेले सहा महिने आपल्या घरातच राहात होती. माञ तिचे पती, मुलगा आणि सुन हे दिनांक २२ मार्च रोजी मुंबई भांडुप येथून पोलादपुरमध्ये आले होते. 

८ एप्रिल रोजी या महिलेला ताप व जुलाब याचा त्रास झाल्यानंतर तिला महाड मधील खाजगी दवाखान्यात उपचार केले असता आणि तिचा त्रास पाहता तिला कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने व्हेंटिलेटर लावून तिला पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिचा रिपोर्ट पोझेटिव्ह आला आहे. आज प्रशासकीय यंत्रणा कमला लागली असून तिचा मुलगा सून आणि पती यांना आज तपासणीसाठी एम. जी. एमला पाठविण्यात येणार आहे. मात्र आता पोलादपूर शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.