रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यावर यावर्षीसुद्धा कोरोनाचे संकट…

शिवराय मनामनात, शिवराज्याभिषेक घराघरात' या संकल्पनेने सोहळा साजरा होणार असल्याची शक्यता आहे. ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करून रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न होणार आहे.

    रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा मागच्या वर्षीसुद्धा कोरोना संकटामुळे अगदी मोजक्या लोकांमध्ये आणि अत्यंत साध्या पद्धतीने झाला. मध्ये कोरोना रुग्णांमध्ये घट होत असल्याने कोरोना नियंत्रणात आला असे वाटले होते. पण परत रुग्णसंख्या, मृत्युदर वाढत गेला आणि राज्यातील जनतेला पुन्हा एकदा लॉकडाऊनचा सामना करावा लागला.

    त्यामुळे यावर्षीसुद्धा ६ जुन रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यावरसुद्धा कोरोनाचे सावट आहे. छत्रपती संभाजीराजे हे २७ तारखेला शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. परंतु शिवभक्तांनी रायगडाचे वेध, नियोजनासाठी प्राथमिक बैठका सुरू आहे. शिवराय मनामनात, शिवराज्याभिषेक घराघरात’ या संकल्पनेने सोहळा साजरा होणार असल्याची शक्यता आहे. ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करून रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न होणार आहे.