८८ वर्षांच्या वृद्धाला मारहाण करून ११ हजारांची चोरी, तिघांवर गुन्हा दाखल

पाली : सुधागड तालुक्यातील वसुधा सोसायटीमध्ये राहणाऱ्या ८८ वर्षीय वयोवृद्ध इसमाला बेदम मारहाण करून घरातील रोख रक्कम चोरली. याप्रकरणी चिवे येथील तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाफेघर

 पाली : सुधागड तालुक्यातील वसुधा सोसायटीमध्ये राहणाऱ्या ८८ वर्षीय वयोवृद्ध इसमाला बेदम मारहाण करून घरातील रोख रक्कम चोरली. याप्रकरणी चिवे येथील तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाफेघर हद्दीतील वसुधा सोसायटी येथे राहणारे शंकर नारायण कृष्णन अय्यर सिके उर्फ अंकल यांचा बंगला असून ते  या बंगल्यामध्ये  एकटेच राहतात. 

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, १७ एप्रिल रोजी सायंकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या बंगल्याच्या उघड्या दरवाजातून आत प्रवेश करून घरातील कपाटामधून रोख रक्कम११ हजार रुपये चोरत असताना व घरातील सामानाची तोडफोड करीत असताना बंगल्यात राहणारे शंकर नारायण कृष्णा अय्यर यांनी आरोपी संजय ठाकूर, सचिन ठाकूर व जयेश ठाकूर यांना विरोध केल्याने आरोपींनी त्यांना हाता बुक्क्यांनी व लाथेने ,बांबूच्या काठीने तोंडावर ,डोक्यावर हातावर मारहाण करून जबरी जखमी केले या प्रकरणी सोसायटीचे सुपरवायझर बबन पुशिलकर यांनी पाली पोलीस स्थानकात फिर्याद नोंदविली आहे .आरोपी संजय ठाकूर, सचिन ठाकूर व जयेश ठाकूर यांच्या विरोधात पाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात दाखल करण्यात आला आहे. वसुधा सोसायटीमध्ये अनेक धनिकांचे बंगले आहेत. शहरापासून लांब व निसर्गाच्या सानिध्यात सुरक्षित राहता यावे याकरिता येथे बंगले बांधण्यात आले आहे. मात्र मागील काही दिवसांपासून वसुधा सोसायटीमध्ये गुन्हेगारी प्रकरण वाढत असल्याने येथे राहणे असुरक्षित समजले जात आहे .